दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात अर्पित करू नका या वस्तू, नाहीतर लक्ष्मी माता होईल रुष्ट

दिवाळीचा सण सुख-समृद्धी आणि धन-संपदा प्राप्तीचे मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. दिवाळीचा सण जगभरातील हिंदू धर्मीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यावर्षीचे लक्ष्मीपूजन 27 ऑक्टोबर 2019 रोजी आहे. यादिवशी सगळे लोक विधी विधान पूर्वक माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा अर्चना करतील.

जर आपण धार्मिकशास्त्र अनुसार पाहिले तर आपल्याला दिवाळीच्या पूजेची फलप्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा आपण माता लक्ष्मीचे पूजन हे नियमांच्या अनुसार कराल. शास्त्रा मध्ये लक्ष्मी पूजनाच्या दरम्यान काही गोष्टी अश्या आहेत ज्यांचा वापर मुळीच केला नाही पाहिजे अन्यथा यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर रुसवा धरू शकते.

आज आपण या पोस्टच्या माध्यमातून दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दरम्यान कोणत्या गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला पूजेचे फळ प्राप्ती होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊ शकेल याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी यागोष्टी ठेवा लक्षात

जर आपण दिवाळीला माता लक्ष्मीचे पूजन करत असाल तर आपण जो दिवा लावू त्यामध्ये लाल रंगाची वात वापरली पाहिजे आणि यास माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवा.

शास्त्राच्या अनुसार धनाची देवी माता लक्ष्मीच्या पूजे मध्ये तुळशीची पाने वापरणे वर्जित मानले गेले आहे कारण तुळशी भगवान विष्णू यांना अधिक प्रिय आहे पण देवी लक्ष्मी तुळशीला पसंत नाही करत कारण हि भगवान विष्णू यांचे दुसरे स्वरूप शालिग्राम ची पत्नी आहे, त्यामुळे जर आपण दिवाळीला माता लक्ष्मीची पूजा करत असाल तर तुळशीचा वापर बिलकुल करू नये.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला पांढरे फुल अर्पित नाही केले पाहिजे कारण माता लक्ष्मी सुवासिनी आहेत आणि यांना लाल रंगाचे फुल अति प्रिय आहे, त्यामुळे नेहमी आपण यांना पूजेच्या दरम्यान लाल गुलाब आणि लाल कमळ ही फुले अर्पित करावीत.

जर आपण दिवाळीला माता लक्ष्मीचे पूजन करत असाल तर त्यांच्या सोबत भगवान विष्णूची पूजा अवश्य करावी कारण जर आपण लक्ष्मी पूजा सफल करू इच्छिता तर भगवान विष्णूची पूजा अवश्य करावी लागेल. दिवाळीला संध्याकाळी आपण गणपतीच्या पूजे नंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे पूजन करा.

दिवाळीला माता लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती माता यांची पूजा देखील केली जाते. कारण विना ज्ञान आणि बुद्धी व्यक्ती धन प्राप्ती करू शकत नाही आणि या दिवशी आपण गणपती आणि माता सरस्वतीची पूजा करून त्यांना बुद्धी आणि ज्ञान प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करतो.

पूजा-अर्चना झाल्या नंतर प्रसाद अवश्य अर्पित करावा, आपण दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या वेळी प्रसाद दक्षिण दिशेला आणि फुले मातेच्या समोर ठेवावीत.

वरील प्रमाणे काही दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या संबंधित गोष्टी आहेत. जर आपण या गोष्टी लक्षात ठेवून त्या प्रमाणे लक्ष्मी पूजन केले तर माता लक्ष्मी आपल्यावर लवकरच प्रसन्न होईल आणि आपल्या जीवनातील धनाच्या संबंधीत समस्यां दूर होईल. जर आपण दिवाळीला विधी विधानपूर्वक आणि नियमाचे पालन करून पूर्ण श्रद्धेने लक्ष्मी पूजन केले तर आपली पूजा यशस्वी होईल आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतील.