foodhealthPeople

तुमच्या ब्‍लड ग्रुपनूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन

‘ब्लड टाइप’वर आधारित आहार घेतला तर भोजन चांगले पचन होते. शरीरातील उर्जा वाढते आणि त्याने आपण रोगांपासून वाचतो.असा आहार घेतला तर, आपले वजनही कमी केले जाऊ शकतो…

आपला रक्तगट आपले आरोग्य आणि आपल्या तंदुरुस्तीचा मुख्य अनुवांशिक फॅक्टर असतो हे अनेक अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. रक्तगट हे मुख्यत्वे: चार प्रकारचे असतात. ए, बी, एबी आणि आे. निगेटिव्ह आणि पॉझेटिव्ह हे उपप्रकार मिळून ते आठ प्रकारचे होतात. आपल्या रक्तगटानुसार घेतलेला आहार महत्त्वाचा ठरतो कारण अन्नाचे योग्य पचन होऊन योग्य ऊर्जा मिळते. काही लोकांचे शरीर सहज वजन कमी करू शकते, तर काहींना वजन कमी करायला खूप कसरत घ्यावी लागते. काही लोकांना जुने आजार वारंवार होतात. काही लोक मात्र खूप तंदुरुस्त असतात. ब्लड ग्रुपनुसार काही लोकांचा मुड कायम बदलत असतो अाणि स्वभावातही चढ-उतार होत असतो. रक्तगटानुसार प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा ठरतो.

डाएट प्लॅनमध्ये आरएच फॅक्टर महत्त्वाचा..

आरएच पॉझिटिव्हच्या तुलनेत आरएच निगेटिव्हमध्ये जास्त आयजीई अॅलर्जी असते. ज्यांचा रक्तगट आरएच निगेटिव्ह आहे त्यांना भुईमुगाची जास्त अॅलर्जी असते. हा फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण असतो. कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फॅक्टरमध्ये खूप फरक असतो.

वाढलेले वजन कमी करायचे तर हे सुद्धा करून पहा

रक्तगटानुसार घेतला जाणारा आहार आपल्याला अानुवंशिक रोगांवर नियंत्रण मिळवायला मदत करतो. डायबिटीज, किडनी संबंधी आजार, कोलेस्टेरॉल, हायपरटेंशन आदींमध्ये ते फायदेशीर आहे.

ब्लड ग्रुप ‘ए’

तांदूळ, ओट्स, मोहरी, पास्ता, काशीफळाच्या बिया, शेगादाणे, अंजीर, लिंबू, बेदाणे, मनुखा, मेथी खाने फायदेशीर आहे. तसेच गव्हाच्या जाड पिठाच्या चपात्याही या रक्तगटाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. मांसाहार या लोकांसाठी जास्त फायदेशीर नसतो. गेहू, ब्राउन राइस, पास्ता, पोहे, सोयाबीन, बेसनाच्या वड्या खाने फायदेशीर आहे.

ब्लड ग्रुप ‘बी’

हिरव्या पालेभाज्या, अंडे, कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ यांनी घ्यायला हवेत. जास्तीत जास्त ओट्स, दुधाचे पदार्थ अॅनिमल प्रोटीन यांच्यासाठी चांगले आहे.या रक्तगटाच्या लोकांना गहू जास्त फायदेशीर ठरत नाही. ओट्स, प्रॉन्स, पनीर, अंडे, मासे, कोळंबी यांच्यासाठी चांगले आहे.

ब्लड ग्रुप ‘एबी’

सीफूड, दही, बकरीचे दूध, अंडे, बाजरी, ओट्स, मोहरी, गेहू, मोड आलेले गहू, ब्रोकली, पत्ताकोबी, बीट,काकडी, आलूबुखारा, बेरी खाने जास्त फायदेशीर आहे. डाळभात, डाळपोळी, दलिया खिचडी, ब्राउन राइस, पुलाव हे सुद्धा फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असल्याने ते सुद्धा या रक्तगटाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे.

ब्लड ग्रुप ‘आे’

मटण, मासे, अंडे, कोबी, सलाद, ब्रोकली, कांदा, काशीफळ, लाल मिरची, भेंडी, लसूण, अद्रक, चेरी, अंजीर, आलूबुखारा, रासबेरी, क्रेनबेरी, गूसबेरी, प्रोटीन, चीजयुक्त पदार्थ जास्त फायदेशीर असतात. अंड्याचे पांढरे बलक, मासे, चिकन, सँडविच, ढोकळा, डोसा, इडली, उत्तपा खाणेही या रक्तगटाच्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.


Show More

Related Articles

Back to top button