Astrology

चुकूनही या दिशेला लावू नये मनी प्लांट, आत्ताच सुधारा आपली चुक अन्यथा कंगाल बनाल

घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवाहित करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे झाडे/रोपटे घरामध्ये लावतात. पण एक झाड असे आहे जे जवळपास सगळ्या घरामध्ये पाहण्यात येते. असे बोलले जाते कि हे रोपटे लावल्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धीचे आगमन होते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते. आपण समाजाला असालच आम्ही कोणत्या रोपट्या बद्दल बोलत आहोत. होय ते मनी प्लांट आहे. आपण सगळे आपल्या घरामध्ये मनी प्लांट लावतो पण त्यास लावण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित नाही. आपण कोणत्याही दिशेला मनी प्लांट ठेवतो. ज्यामुळे नुकसान सहन करावे लागते. पण ही गोष्ट खरी आहे कि मनी प्लांट लावल्यामुळे घरामध्ये सुखाचे आगमन होते आणि पैश्यांची तंगी दूर होते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा यास लावतांना काही महत्वाच्या नियमांचे पालन केले गेले. चला तर पाहू आपल्याला मनी प्लांट लावतांना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही मनी प्लांट लावण्याचा विचार करत असाल किंवा अगोदरच लावलेले असेल तर या गोष्टींची काळजी घ्यावी.

मनी प्लांट लावण्याचे नियम

मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच इशान्य कोपऱ्यात ठेवू नये. ही दिशा या रोपट्यासाठी नकारात्मक मानली जाते. जर आपण या दिशेला मनी प्लांट लावला तर आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नाही तर आपल्या आरोग्य आणि नात्यांवर देखील याचा नकारात्मक प्रभाव होऊ शकतो.

कधीही मनी प्लांटच्या वेलीला जमिनीवर किंवा फरशीवर पसरवून ठेवू नये. असे केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकतात.

घराच्या बाहेर मनी प्लांट लावण्याच्या एवजी घराच्या आत मध्ये लावावे. यास एखाद्या कुंडी मध्ये किंवा बाटली मध्ये लावावे.

मनी प्लांटची पाने नेहमी ताजी आणि चांगली असावीत. कधीही सुकलेली आणि कोमजलेली मनी प्लांट घरामध्ये लावू नये. कोमजलेली आणि सुकलेली पाने अशुभ मानली जातात. दररोज यामध्ये पाणी घालावे. जर पाने कोमजली असतील किंवा पांढरी पडली असतील तर त्यांना कापावीत.

घरामध्ये मनी प्लांट लावल्यामुळे धन आगमना मध्ये वाढ होईल. हे फक्त धना मध्ये वाढच नाही तर नात्यातील गोडवा देखील वाढवतो. जर आपल्या वैवाहिक जीवना मध्ये तणाव सुरु असेल तर आपण मनी प्लांटचे रोपटे लावावे यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद वाढेल.

घरामध्ये मनी प्लांट आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. असे यासाठी कारण या दिशेची देवता गणपतीस मानले गेले आहे. त्यामुळे जर या दिशेला मनी प्लांट लावले तर घरामध्ये सुख-समृद्धी टिकून राहते.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close