तुमच्या किचनसाठी कुकींग टिप्स ज्या नेहमी तुम्हाला उपयोगी येतील

0
23

प्रत्येक किचन मध्ये प्रत्येक महिलेचे काहींना काही सिक्रेट टिप्स असतात ज्यांना वापरून ते आपले किचन इतरांपेक्षा वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण काही अश्या टिप्स पाहू ज्या तुम्हाला नेहमी उपयोगी पडतील.

कोणत्याही भाजीला अजून जास्त टेस्टी बनवण्यासाठी भाजी तयार झाल्यावर थोडा चाट मसाला टाकून एक ते दोन मिनिट टाकून शिजवा. यामुळे भाजीचा स्वाद अजून जास्त वाढेल.

हिरव्या पालेभाज्यांचा रंग शिजवल्या नंतर बदलतो तो बदलू नये यासाठी हिरव्या भाज्या शिजवताना त्यामध्ये एक चिमूट साखर टाकावी यामुळे भाजीचा रंग हिरवाच राहतो.

कोणत्याही कोरड्या भाजीला अजून जास्त टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये लोणच्याचा मसाला मिक्स केल्यास भाजीची टेस्ट अजून जास्त वाढते.

मेथीच्या शंकरपाळ्या बनवताना मेथी (पालेभाजी) थोडी तेलामध्ये फ्राय करून नंतर पिठामध्ये मिक्स कराव्यात. यामुळे शंकरपाळी तळताना मेथी बाहेर निघत नाही.

लोण्या पासून तूप बनवताना त्यामध्ये एक खायचे पान टाकलं तर त्यामुळे स्मेल (वास) येत नाही.

गुजराती डाळ बनवताना फोडणी मध्ये थोडं लोणच्याचा मसाला टाकल्याने डाळ अजून जास्त चविष्ट बनते.

मुंग डाळीचे भजी बनवताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स केल्याने भजी जास्त क्रिस्पी बनतात.

कोणतीही भाजी फ्रिज मध्ये दोन ते तीन दिवस ठेवायची असेल तर त्यास पेपर ने व्यवस्थित गुंडाळून ठेवल्याने भाजी खराब होत नाही आणि सुकत देखील नाही.

डोसे बनवताना त्यामध्ये एक चमचा मेथी दाण्यांची पेस्ट मिक्स केल्याने डोसा क्रिस्पी बनतो.

पदार्था मध्ये मिरची (तिखट) जास्त झाल्यास त्यामध्ये लिंबू रस मिक्स केल्याने तिखटपणा कमी होतो.

भाजीचा रसा (ग्रेव्ही) चांगली बनवण्यासाठी त्यामध्ये टमाटर आणि लसूण यांना एकत्र पेस्ट करून टाकल्याने चव चांगली येते.

100 ग्राम शेंगदाणे भाजून त्यामध्ये दोन तीन लसूण, दोन ते तीन हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून वाटावे. गरमा गरम पराठे किंवा पोळी सोबत चटणी छान चविष्ट वाटते.

चिकन मध्ये टमाटर ऐवजी दही टाकल्याने चिकन जास्त चविष्ट बनते.

आपल्याला या कुकिंग टिप्स कश्या वाटल्या कमेंट मध्ये आवश्य कळवा तसेच पोस्ट शेयर करून इतरांना देखील कळवा . तुम्हाला अश्याच उत्तमोत्तम कुकिंग टिप्स अजून वाचायच्या असतील तर पोस्टला लाईक करून आपली पसंती कळवा.