Connect with us

या 3 लोकांच्या भल्याचा विचार कधीच नाही केला पाहिजे : आचार्य चाणक्य

Uncategorized

या 3 लोकांच्या भल्याचा विचार कधीच नाही केला पाहिजे : आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या चांगल्या जीवनासाठी काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने अवलंबल्या तर आपण आपल्या जीवना मध्ये नक्कीच यशस्वी होऊ. चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्राच्या विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य सांगतात कि एका समजदार व्यक्तीने कधीही या तीन प्रकारच्या व्यक्तींचा विचार केला नाही पाहिजे.

1. आपण कधीही कोणत्याही मूर्ख स्त्री किंवा पुरुषाला ज्ञान दिले नाही पाहिजे

चाणक्य म्हणतात कि आपण कधीही मूर्ख स्त्री किंवा पुरुषाला ज्ञान नाही दिले पाहिजे कारण त्यांच्यासाठी ज्ञानाला काही महत्व नसते. ते तुमच्या गोष्टींना समजू शकत नाहीत आणि अश्या व्यक्तीला आपले म्हणणे समजावणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे त्यामुळे त्यांना समजावले नाही पाहिजे. तुम्ही हे त्याच्या चांगल्यासाठी करता परंतु त्याला याची जाणीव नसते. त्याला ज्ञान देण्याच्या नादात तुम्हाला तणावाला सामोरे जावे लागते त्यामुळे अश्या लोकांचे चांगले करण्याच्या बाबतीत विचार करू नका आणि त्यांच्या पासून लांब राहा.

2. चरित्रहीन आणि भांडखोर स्वभावाच्या स्त्री किंवा पुरुषा सोबत संबंध ठेवू नका.

चरित्रहीन आणी भांडखोर स्वभावाच्या स्त्री किंवा पुरुषा सोबत संबंध ठेवणारा आणि त्यांना सांभाळणारा सुखी होत नाही, असे लोक फक्त तुमच्या पैश्यांवर प्रेम करतात. जर एखादा चांगला व्यक्ती यांच्या सोबत राहतो तर त्यामुळे त्या चांगल्या व्यक्तीची समाजामध्ये प्रतिष्ठा कमी होते. जे चरित्रहीन लोक आपल्या धर्माच्या मार्गा पासून भटकतात आणि अधर्माच्या मार्गी लागतात ते आपल्या सोबत चांगल्या लोकांना देखील अधर्मी बनवतात. त्यामुळे अश्या लोकांपासून दूर राहावे.

3. आपल्या जवळ असलेल्या गोष्टींवर समाधानी नाही आणि नेहमी दुखी राहणारे लोक यांच्या पासून दूर राहा.

चाणक्य म्हणतात कि जे लोक आपला जवळ असलेल्या गोष्टींवर समाधानी नसतात आणि नेहमी दुखी राहतात आणि नेहमी रडत असतात अश्या लोकांच्या सोबत राहिल्यामुळे तुम्हाला देखील दुखाची प्राप्ती होते. जे समजदार आणि ज्ञानी असतात ते कमी गोष्टींमध्ये देखील समाधानी असतात आणि त्यामध्ये देखील आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्यक गोष्टींसाठी दैवाला दोष देत नाहीत. विनाकारण दुखी राहणारे लोक दुसऱ्यांना दोष देतात आणि त्यांचा तिरस्कार करतात त्यामुळे अश्या लोकांच्या पासून दूर राहणे चांगले असते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top