Connect with us

गरुड पुराणाच्या या गोष्टींकडे ठेवा लक्ष, आयुष्यात यश नक्की भेटेल, बनाल सौभाग्यशाली

Dharmik

गरुड पुराणाच्या या गोष्टींकडे ठेवा लक्ष, आयुष्यात यश नक्की भेटेल, बनाल सौभाग्यशाली

असे अनेक लोक असतील ज्यांना गरुड पुराणाच्या बद्दल माहिती असेल गरुड पुराणामध्ये स्वर्ग नरक पाप-पुण्य याच्या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. यामध्ये ज्ञान-विज्ञान नीती नियम आणि धर्म बद्दलच्या गोष्टी देखील गरुड पुरातात आहेत. यामध्ये व्यक्तीचे जीवन समाप्त झाल्यानंतरचे रहस्य आहे तर दुसरीकडे व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य देखील गरुड पुराणात आहे.

हे पुराण भगवान विष्णूच्या भक्ती आणि ज्ञानावर आधारित आहे प्रत्येक व्यक्तीला हे पुराण आवश्य वाचले पाहिजे. गरुड पुराण हे प्रसिध्द धार्मिक ग्रंथा पैकी एक मानले जाते. गरुड पुराणा मध्ये मनुष्य जीवनाच्या बद्दलची चांगली माहित सांगितली गेली आहे.

आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये गरुड पुराणातील अश्या काही गोष्टी सांगत आहोत ज्यांच्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला जीवनामध्ये कधीही अपयश मिळणार नाही या गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही जीवनात भरपूर प्रगती कराल.

सतर्कता आणि संयम

गरुड पुराणाच्या नीती मध्ये सांगितले गेले आहे की शत्रू सोबत सामना करताना नेहमी सतर्कता आणि चतुरता बाळगली पाहिजे कारण शत्रू नेहमी तुम्हाला हानी करण्याचा प्रयत्न करेल अश्या स्थिती मध्ये जर तुम्ही चतुरता दाखवली नाही तर तुम्हाला नुकसान भोगावे लागेल. यासाठी जसा शत्रू असेल त्याप्रमाणे चतुरता दाखवून त्याच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

कपडे स्वच्छ आणि सुगंधित

जर व्यक्तीला श्रीमंत होण्याची इच्छा आहे आणि त्याला आपले भाग्य चांगले करायचे असेल तर त्याने नेहमी स्वच्छ आणि सुगंधित कपडे वापरले पाहिजेत गरुड पुराणाच्या अनुसार जर व्यक्ती मळके कपडे धारण करतो तर त्याचे सौभाग्य नष्ट होते ज्या घरामध्ये असे लोक असतात जे घाणेरडे कपडे धारण करतात त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी वास करत नाही त्याघरातून सौभाग्य निघून जाते आणि घरामध्ये दारिद्र्य येते. यासर्व कारणामुळे आपल्याला स्वच्छ आणि सुगंधित कपडे धारण केले पाहिजेत ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल.

शरीर राहील निरोगी

जर व्यक्ती संतुलित भोजन करत असेल तर त्याचे शरीर निरोगी राहते. संतुलित आहारानेच एक चांगले शरीर मिळवले जाऊ शकते आणि आजारांना दूर ठेवले जाऊ शकते. भोजन हेच आपल्या उर्जेचे मूळ आहे त्यामुळे बहुतेक आजार असंतुलित आहार आणि खानपान यामुळे होतात. असंतुलित आहार आपले पाचन तंत्र बिघडवते आणि त्यामुळे विविध आजार होतात.

तुळशीचे महत्व

तुळशीच्या महत्वा बद्दल गरुड पुराणाच्या सोबत अनेक पुराण आणि ग्रंथात तसेच विज्ञानात देखील सांगितले गेलेले आहे. जर तुळशी घरा मध्ये असेलतर अनेक आजारा पासून दूर राहता येते. जर तुळशीचे दररोज सेवन केले गेले तर अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते. जर भगवान विष्णूच्या पूजे नंतर तुळशीची पूजा केली तर चांगले फळ प्राप्त होतात. तुळशीला नियमित जल अर्पित केल्याने जीवनात येणारे अनेक अडथळे दूर होतात.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top