ATM Card Rules: आजकाल बहुतेक लोक बँकेत खाते उघडतात आणि त्यासोबत मिळणाऱ्या पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्डचा वापर करतात. चेक देऊन दुसऱ्या व्यक्तीला खात्यातून पैसे काढता येतात, तर एटीएम कार्डद्वारे स्वतः पैसे काढता येतात. पण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या एटीएम कार्डातून पैसे काढणं कायदेशीर आहे का?
मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डातून पैसे काढू नयेत
अनेकदा कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डाचा वापर पैसे काढण्यासाठी करतात. हे कायदेशीररित्या चुकीचं आहे आणि बँकेला याची माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
पैसे काढण्याची योग्य पद्धत
मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं आवश्यक आहे. मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा हक्क आपल्या नावावर मिळवल्यानंतरच तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.
नॉमिनी व्यक्ती असल्यास
जर तुम्ही मृत व्यक्तीच्या बँक खात्यात नॉमिनी असाल तर तुम्हाला बँकेला मृत्यूची माहिती देणं आवश्यक आहे. बँकेत जाऊन तुम्हाला एका फॉर्ममध्ये मृत व्यक्तीची पासबुक, खाते टीडीआर, मृत्यू प्रमाणपत्र आणि तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करावं लागेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.