Jio आणि Airtel यांनी आपल्या ग्राहकांसाठी 5G सेवा आधीच सुरू केली होती, ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळत आहे. मात्र, Vi या स्पर्धेत मागे राहिला होता. Vi ने अद्याप देशभरात 5G सेवा सुरू केलेली नाही. शिवाय, Vi चे रिचार्ज प्लॅन्स महाग असल्याने गेल्या काही दिवसांत Vi च्या युजर्सला मोठे नुकसान झाले. मात्र, आता Vi ने आपल्या युजर्ससाठी एक दिलासादायक बातमी आणली आहे.
Vi अनलिमिटेड 4G डेटा
Vodafone Idea (Vi) ने Jio आणि Airtel च्या अनलिमिटेड 5G सेवेला टक्कर देण्यासाठी अनलिमिटेड 4G डेटा सेवा सुरू केली आहे. Vi च्या या नवीन सुविधेमुळे आता युजर्सना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
Vi युजर्सना मिळणार सुपरफास्ट अनलिमिटेड डेटा
Vi ने आपल्या युजर्ससाठी असे अनेक प्लॅन्स लॉन्च केले आहेत, जे FUP म्हणजेच Fair Usage Policy च्या मर्यादेत येत नाहीत. हे प्लॅन्स Vi च्या अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या Vi ची अनलिमिटेड 4G सेवा फक्त मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि काही मर्यादित भागांमध्येच सुरू करण्यात आली आहे.
Vi च्या या प्लॅन्समध्ये मिळेल अनलिमिटेड 4G डेटा
Vi च्या अनलिमिटेड 4G डेटा सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील रिचार्ज प्लॅन्स निवडू शकता:
- ₹365
- ₹379
- ₹407
- ₹449
- ₹408
- ₹469
याशिवाय, ₹649, ₹979, ₹994, ₹996, ₹997, ₹998, आणि ₹1198 च्या रिचार्ज प्लॅन्समध्येही हा लाभ उपलब्ध आहे.
Vi च्या या अनलिमिटेड 4G डेटा सेवेमुळे युजर्सना वेगवान इंटरनेट अनुभव आणि मोठ्या प्रमाणावर डेटा वापरण्याचा लाभ होणार आहे.