Indian Railway interesting Rules: रेल्वेने प्रवास करताना भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक सुविधा देते, ज्याची माहिती बहुतेक जणांना नसते. एक ट्रेनचे तिकीट खरेदी करताच प्रवाशांना अनेक अधिकार मिळतात, तेही पूर्णपणे मोफत. यात ट्रेनमध्ये मोफत बेडरोलपासून मोफत जेवण मिळण्यापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया की, भारतीय रेल्वे कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे प्रवाशांना या सुविधा उपलब्ध करून देते.
मोफत बेड रोल
Indian Railway आपल्या प्रवाशांना AC1, AC2, AC3 च्या सर्व कोचमध्ये एक ब्लँकेट, एक उशी, दोन बेडशीट आणि एक हँड टॉवेल देते. मात्र, गरीब रथ एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना यासाठी 25 रुपये भरावे लागतात.
याशिवाय काही ट्रेनमध्ये स्लीपर क्लासमधील प्रवाशांनाही बेडरोल मिळू शकतो. जर तुम्हाला ट्रेनच्या प्रवासादरम्यान बेडरोल मिळत नसेल, तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करून रिफंड मागू शकता.
फ्री मेडिकल हेल्प
प्रवासादरम्यान जर तुम्हाला प्रकृती खालावत असल्याचे वाटले, तर रेल्वे तुम्हाला मोफत प्राथमिक वैद्यकीय मदत देते.
जर परिस्थिती गंभीर असेल, तर पुढील उपचाराचीही व्यवस्था केली जाते. यासाठी तुम्ही फ्रंटलाइन कर्मचारी, तिकीट संकलक (TC), ट्रेन अधीक्षक यांच्याशी संपर्क साधू शकता.
आवश्यक असल्यास, भारतीय रेल्वे पुढील स्टॉपवर योग्य शुल्क घेऊन मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था करते.
फ्री फूड
जर तुम्ही राजधानी, दुरंतो किंवा शताब्दी सारख्या प्रिमियम ट्रेनने प्रवास करत असाल आणि ट्रेन दोन तासांहून अधिक उशिरा धावत असेल, तर रेल्वे तुम्हाला मोफत जेवण देते.
याशिवाय, जर ट्रेन लेट असेल आणि तुम्हाला चांगले जेवण हवे असेल, तर तुम्ही IRCTC ई-कॅटरिंग सेवा वापरून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करू शकता.
स्टेशनवर एका महिन्यासाठी सामान ठेवण्याची सुविधा
बहुतेक लोकांना माहिती नसते की देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर क्लॉकरूम आणि लॉकर रूम उपलब्ध असतात.
तुम्ही तुमचे सामान जास्तीत जास्त 1 महिना या लॉकर रूम किंवा क्लॉकरूममध्ये ठेवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागते.
फ्री वेटिंग हॉल
जर तुम्ही एखाद्या स्टेशनवर उतरल्यानंतर पुढील ट्रेन पकडण्यासाठी काही वेळ थांबणार असाल किंवा इतर कोणत्या कारणाने स्टेशनवरच थांबावे लागत असेल, तर तुम्ही AC किंवा नॉन-AC वेटिंग हॉलमध्ये मोफत थांबू शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या ट्रेनचे तिकीट दाखवावे लागते.