Senior Citizen Bank FD Rate: अनेक बँका सीनियर सिटीझनना Fixed Deposit (FD) वर चांगल्या व्याजदराची ऑफर देत आहेत. हे व्याजदर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. जर आपण सीनियर सिटीझन असाल आणि एफडीसाठी चांगल्या व्याजदराच्या शोधात असाल, तर या बँकांमध्ये आपली रक्कम गुंतवू शकता. गुंतवणूक करण्यापूर्वी बँकांचे व्याजदर तपशीलवार यादी तपासणे महत्त्वाचे आहे.
एफडीमध्ये गुंतवणूक करणे अनेक लोक सुरक्षित मानतात. याचे कारण म्हणजे, यात शेअर मार्केटसारख्या घसरणीचा धोका नसतो. गुंतवणूकदारांना निश्चित व्याजासह परतावा मिळतो. काही गुंतवणूकदार अशा प्रकारची गुंतवणूक पसंत करतात ज्यामध्ये जोखीम कमी असते. त्यामुळे एफडी हा त्यांच्या दृष्टीने एक चांगला पर्याय ठरतो.
सीनियर सिटीझनसाठी एफडीचा आकर्षक पर्याय
काही बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत. सीनियर सिटीझनना सामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत अधिक व्याज मिळते. त्यामुळे सीनियर सिटीझन एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सध्या काही बँका सीनियर सिटीझनना (60 वर्षांवरील लोक) 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर ऑफर करत आहेत.
टॅक्समध्ये मिळतो फायदा
सीनियर सिटीझन एफडीमध्ये गुंतवणुकीवर इनकम टॅक्समध्येही सवलत मिळवू शकतात. Income Tax Act, 1961 च्या कलम 80C अंतर्गत, सीनियर सिटीझन 5 वर्षांच्या लॉक-इन पीरियड असलेल्या एफडीवर 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या इनकम टॅक्स कपातीचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ही सवलत फक्त योग्य लॉक-इन पीरियड असलेल्या एफडीसाठीच लागू होते.
कुठली बँक देतेय किती व्याज?
3 वर्षांच्या एफडीवर अनेक बँका सीनियर सिटीझनना आकर्षक व्याजदर देत आहेत. या व्याजदर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. या बँकांमध्ये प्रायव्हेट सेक्टरपासून पब्लिक सेक्टरपर्यंतच्या बँकांचा समावेश आहे.
Axis Bank
प्रायव्हेट सेक्टरमधील Axis Bank सीनियर सिटीझनना वार्षिक 7.6 टक्के व्याजदर देते. जर आपण या बँकेत 1 लाख रुपयांची एफडी केली, तर एका वर्षानंतर 1,07,819 रुपये मिळतील. तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर ही रक्कम 1,25,340 रुपयांपर्यंत वाढेल.
Bandhan Bank
बंधन बँक सुद्धा सीनियर सिटीझनना एफडीवर चांगला परतावा देते. बंधन बँक 7.75 टक्के वार्षिक व्याजदराची ऑफर देते. या बँकेत 1 लाख रुपयांची एफडी केल्यास एका वर्षानंतर 1,07,978 रुपये मिळतील, तर तीन वर्षांनंतर ही रक्कम 1,25,895 रुपयांपर्यंत पोहोचेल.
RBL Bank
RBL Bank सीनियर सिटीझनना वार्षिक 8 टक्के व्याजदराची ऑफर देते. जर आपण या बँकेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर एका वर्षानंतर 1,08,243 रुपये मिळतील. तीन वर्षांनंतर ही रक्कम 1,26,824 रुपयांपर्यंत जाईल.
DCB Bank
DCB Bank सीनियर सिटीझनना सर्वाधिक व्याजदराची ऑफर देते. या बँकेचा वार्षिक व्याजदर 8.05 टक्के आहे. जर आपण 1 लाख रुपयांची एफडी केली, तर एका वर्षानंतर 1,08,296 रुपये मिळतील. तीन वर्षांनंतर ही रक्कम 1,27,011 रुपयांपर्यंत वाढेल.