आपल्या घराजवळील पोस्ट ऑफिस हे फक्त पत्रं पाठवण्यासाठी नसून, तुमच्या बचतीचं सुरक्षित ठिकाण देखील ठरू शकतं. विशेषतः, जर आपण निवृत्त झालेले असाल किंवा निवृत्तीची तयारी करत असाल, तर पोस्ट ऑफिसची ‘सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS)’ ही तुमच्यासाठी अतिशय लाभदायक योजना ठरू शकते.
8.2% मजबूत व्याज आणि सरकारी हमी
सध्या या योजनेत वार्षिक 8.2% व्याजदर दिला जातो, जो बँकेच्या बहुतांश ठेवींपेक्षा अधिक आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, कारण ही योजना भारत सरकारच्या हमीखाली चालवली जाते.
दरमहा निश्चित उत्पन्न मिळवा
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 30 लाख रुपये गुंतवले, तर त्याला दरवर्षी सुमारे 2.46 लाख रुपये व्याज मिळतं. हे व्याज प्रत्येक तिमाहीला खात्यात जमा केलं जातं, म्हणजे तीन महिन्यांमध्ये सुमारे ₹61,500 आणि दरमहा सरासरी ₹20,500 ची नियमित रक्कम मिळते. निवृत्त व्यक्तींसाठी ही रक्कम मासिक खर्च भागवण्यासाठी फारच उपयुक्त ठरते.
पात्रता: कोण गुंतवू शकतो?
- गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- सरकारी कर्मचारी जे 55 ते 60 वर्षांदरम्यान VRS घेतले आहेत, तसेच
- डिफेन्स सेक्टरमधील रिटायर्ड कर्मचारी, ज्यांचं वय 50 ते 60 वर्षांदरम्यान आहे.
- पती-पत्नी मिळून संयुक्त खाते उघडण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
महत्त्वाचे नियम आणि अटी
ही योजना 5 वर्षांची असून, हवी असल्यास 3 वर्षांपर्यंत वाढवता येते. एका वर्षाआधी खाते बंद केल्यास व्याज दिलं जात नाही. 2 वर्षांपूर्वी बंद केल्यास जास्त दंड आकारला जातो आणि 2 ते 5 वर्षांदरम्यान बंद केल्यास 1% व्याज कमी केलं जातं.
कर सवलतीसाठी देखील फायदेशीर
SCSS योजना केवळ सुरक्षित गुंतवणूकच नाही, तर इन्कम टॅक्स अॅक्टच्या 80C सेक्शनअंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळवून देते. त्यामुळे निवृत्त नागरिकांसाठी ही योजना म्हणजे दुहेरी फायदा – सुरक्षित उत्पन्न आणि टॅक्स बचत.