Samsung ने यावर्षी जानेवारीमध्ये CES 2025 मध्ये पहिल्यांदा आपले Vision AI-पावर्ड स्मार्ट TV सादर केले होते. त्या वेळी या लाइनअपमध्ये कंपनीचे Neo QLED, QLED, OLED आणि The Frame TV हे मॉडेल्स होते. आता जवळपास चार महिन्यांनंतर कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की ही लाईनअप भारतात आणली जाणार आहे.
सध्या कंपनीने भारतात निओ QLED (Neo QLED), QLED, आणि OLED TV साठी रजिस्ट्रेशन सुरू केले आहेत. तसेच, कंपनीने या TV खरेदीवर मिळणाऱ्या खास ऑफर्सचीही घोषणा केली आहे. चला तर पाहूया सविस्तर माहिती…
भारतात Samsung Vision AI पावर्ड TV साठी रजिस्ट्रेशन सुरू
सॅमसंगने अधिकृतरित्या जाहीर केले आहे की Vision AI-पावर्ड Neo QLED, QLED आणि OLED TV साठी भारतात रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. रजिस्ट्रेशन करणाऱ्या संभाव्य खरेदीदारांना या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ₹5000 ची सूट दिली जाणार आहे.
त्यानंतर, इच्छुक खरेदीदारांसाठी आणखी काही आकर्षक लॉन्च ऑफर्स दिल्या जाणार आहेत. यामध्ये नो-कॉस्ट EMI, जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास ₹5000 पर्यंत अतिरिक्त लाभ, आणि अर्ली डिलिव्हरी पर्याय यांचा समावेश आहे. हे सर्व फायदे त्याच खरेदीदारांसाठी उपलब्ध असतील जे सॅमसंगच्या अधिकृत भारतीय वेबसाइटवर जाऊन या अपकमिंग स्मार्ट टीव्हीसाठी रजिस्ट्रेशन करतील.
पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च होणार TV
उपलब्धतेबाबत बोलायचे झाले तर सॅमसंग येत्या पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारतात आपल्या Vision AI-पावर्ड Neo QLED, QLED आणि OLED TV ची अधिकृत लॉन्चिंग करणार असल्याची शक्यता आहे.
Samsung Vision AI TV साठी रजिस्ट्रेशन कसे करावे?
भारतामध्ये Samsung Vision AI TV खरेदीस इच्छुक असलेल्या ग्राहकांनी पुढीलप्रमाणे रजिस्ट्रेशन करावे:
स्टेप 1: सॅमसंगच्या अधिकृत भारतीय वेबसाइटवर भेट द्या.
स्टेप 2: अपकमिंग टीव्हीच्या बॅनरवर दिसणाऱ्या Register Now बटनवर क्लिक करा.
स्टेप 3: खाली स्क्रोल करा आणि आपले नाव, फोन नंबर व ईमेल आयडी अशी माहिती भरा.
स्टेप 4: टीव्हीचा साईझ, मॉडेल आणि खरेदीची अपेक्षित वेळ याबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे निवडा.
स्टेप 5: Samsung च्या अटी व शर्ती स्वीकारा आणि Submit बटनवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, इच्छुक खरेदीदारांना एक कूपन कोड दिला जाईल. या कूपनचा उपयोग 7 मेपासून Samsung च्या अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत शॉपिंग अॅप वर स्मार्ट टीव्ही खरेदी करताना सूट आणि इतर ऑफर्स मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.