Salary vs Saving Account: नोकरी करता असाल तर तुमच्याकडेही सॅलरी अकाऊंट असणारच. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की एक चूक झाली तर तुमचे सॅलरी अकाऊंट बचत खात्यात बदलू शकते आणि बँक तुमच्याकडून विविध प्रकारचे शुल्क वसूल करायला सुरुवात करेल.
कॉर्पोरेट जॉब करत असाल किंवा सरकारी नोकरी असेल, तुम्हाला नियोक्त्याकडून सॅलरी अकाऊंट उघडण्याचा पर्याय दिला जातो. ज्यांच्याकडे हे खाते आहे, त्यांना याच्या फायद्यांची माहिती असेलच. पण, तुम्हाला माहिती आहे का की तुमचे सॅलरी अकाऊंट (Salary Account) एक साधारण बचत खाते (Saving Account) बनू शकते. जर तुमच्याकडून एक चूक झाली तर बँक तुमच्याकडे पूर्वसूचना न देता सॅलरी अकाऊंटला बचत खात्यात बदलू शकते आणि यासोबतच तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा देखील बंद होतील. इतकंच नव्हे तर साधारण बचत खात्यावर दर महिन्याला लागणारी मिनिमम बॅलन्सची पेनल्टीही बँक वसूल करू लागतील.
सध्या छंटनीचा काळ चालू आहे आणि तुम्हीही अशा अनेक बातम्या वाचल्या असतील, जिथे कंपन्यांनी त्यांच्या खर्चात कपात किंवा तोटा कमी करण्यासाठी कर्मचार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. साहजिकच, या कर्मचार्यांच्या खात्यात पगार येणंही बंद झालं असेल. अशा परिस्थितीत जर दुसरी नोकरी लवकर मिळाली नाही तर त्यांच्या सॅलरी अकाऊंटच्या सुविधाही बँक बंद करतील.
कधी बदलते सॅलरी अकाऊंट:
बँकिंग नियमांनुसार, जर तुमच्या सॅलरी अकाऊंटमध्ये सलग 3 महिने पगार आला नाही तर बँक ते साधारण बचत खात्यात बदलू शकते. यासोबतच, तुम्हाला मिळणाऱ्या सुविधाही बंद केल्या जातील. मात्र, तुम्ही स्वतःहूनही तुमचे सॅलरी अकाऊंट साधारण सेविंग अकाऊंटमध्ये बदलू शकता. पण, लक्षात ठेवा की यासोबत सॅलरी अकाऊंटच्या सर्व सुविधा संपुष्टात येतील.
काय होईल नुकसान:
सॅलरी अकाऊंटचे बचत खात्यात रूपांतर होणे तुमच्यासाठी एक धक्का ठरू शकतो. बहुतेक सॅलरी अकाऊंट्स जीरो बॅलन्सवर उघडली जातात, जिथे तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्याची गरज नसते आणि बँक यावर कोणतीही पेनल्टी लावत नाही. जेव्हा तुमचे खाते साधारण बचत खात्यात बदलते तेव्हा त्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक होते आणि ते मेंटेन न केल्यास पेनल्टीचा सामना करावा लागतो.
फ्री मिळणाऱ्या या सुविधा:
जीरो बॅलन्स अकाऊंटसोबत सॅलरी अकाऊंटमध्ये आणखीही सुविधा मिळतात. यामध्ये फ्री चेक बुक, पासबुक, ई-स्टेटमेंट, फीशिवाय डेबिट कार्ड, फोन बँकिंग, ऑनलाइन फंड ट्रान्सफर, डीमॅट खाते व सुविधा, लोनची सुविधा आणि क्रेडिट कार्डचा ऑफर मिळतो. जर तुमचे खाते सेविंग अकाऊंटमध्ये बदलले तर या सुविधांसाठी बँक शुल्क वसूल करायला सुरुवात करेल. याशिवाय, सॅलरी अकाऊंटवर तुम्हाला वार्षिक 3 ते 6 टक्के पर्यंत व्याज मिळते. मात्र, बहुतेक सेविंग अकाऊंट्सवरही तुम्हाला इतकेच व्याज मिळेल.