Rules Change: आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये विमा पॉलिसीशी संबंधित बदल महत्त्वाचे आहेत.
विमा नियामक IRDA च्या नवीन नियमांनुसार, आता कंपन्या नवीन विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक म्हणजेच ई-फॉर्मेटमध्ये जारी करतील.
यासाठी कंपन्यांना प्रत्येक पॉलिसीधारकासाठी डिजिटल विमा खाते उघडावे लागेल. या खात्यात नवीन विमा पॉलिसी जारी केली जाईल. याशिवाय कोणतीही कंपनी नॉमिनीशिवाय जीवन विमा पॉलिसी जारी करू शकणार नाही. तथापि, पॉलिसी जारी झाल्यानंतर नॉमिनी बदलण्याचा पर्याय असेल.
याशिवाय आजपासून नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खात्यात लॉग-इन करण्याची प्रक्रिया कडक करण्यात आली आहे. आता OTP सह आधार आधारित पडताळणी केल्यानंतरच NPS खात्यात लॉगिन करता येईल.
1 एप्रिलपासून 800 हून अधिक प्रकारच्या औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. एसबीआय डेबिट किंवा एटीएम कार्डचे मेन्टेनन्स फी देखील आजपासून वाढणार आहे.