Interest Rate Hike : ‘या’ बँकेचे व्याज दर वाढल्याने लोकांनी घेतला धसका, आता अजून जास्त EMI द्यावा लागणार

RBI: MCLR वाढवण्याचा परिणाम पर्सनल लोन, कार लोन आणि होम लोन यासारख्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होईल. जर तुमचे लोन आधीच चालू असेल तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त EMI भरावे लागेल.

Reserve Bank of India : तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.आरबीआयने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवले ​​आहेत.यामुळे ग्राहकांना व्याजाच्या स्वरूपात जास्त पैसे मोजावे लागत आहेत.आता RBL (RBL Bank) ने व्याजदरात वाढ जाहीर केली आहे.RBL बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात 0.20 टक्के वाढ करण्यात आली आहे.यानंतर आता आरबीएल बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे.

सर्व प्रकारची कर्जे महागणार

MCLR वाढवण्याचा परिणाम पर्सनल लोन, ऑटो लोन आणि सर्व प्रकारच्या गृहकर्जांवर होणार आहे.जर तुमचे कर्ज आधीच चालू असेल तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त EMI भरावे लागेल.मे 2022 पासून आतापर्यंत RBI ने रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांनी सहा वेळा वाढ केली आहे.गेल्या वेळी RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

MCLR म्हणजे काय

MCLR म्हणजे बँक ज्या दराने कर्ज देऊ शकते.MCLR दर 2016 मध्ये लागू करण्यात आला होता.विविध बँकांची कर्जे निश्चित करता यावीत म्हणून असे करण्यात आले.MCLR मधील वाढ किंवा घट EMI वर परिणाम करते.MCLR वाढला तर जास्त EMI द्यावा लागतो, जर कमी झाला तर EMI कमी द्यावा लागतो.

आरबीएल चे नवीन एमसीएलआर दर

>> एक वर्षांसाठी 10.15 टक्के

>> एक महिन्यासाठी 9.05 टक्के

>> 3 महिन्यासाठी 9.35 टक्के

>> 6 महिन्यासाठी 9.75 टक्के

Follow us on

Sharing Is Caring: