Bank Account: 1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नवीन नियम लागू करत आहे. याचा परिणाम देशातील करोडो बँक खात्यांवर होऊ शकतो. जर तुम्हालाही तुमच्या बँक खात्याशी संबंधित सुविधा गमवायच्या नसतील, तर हे बदल समजून घेऊन वेळेत कारवाई करा. नाहीतर, नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन अडचणी घेऊन येऊ शकतं.
आरबीआयचा उद्देश
आरबीआयने बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि प्रभावी बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमांचा उद्देश फसवणूक थांबवणे, डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणे आणि बँकिंग प्रणाली अधिक चांगली बनवणे हा आहे. विशेषतः निष्क्रिय खात्यांमध्ये संभाव्य धोके आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
कोणते खाते बंद केली जातील?
आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार तीन प्रकारची बँक खाती बंद केली जातील.
डॉर्मंट अकाउंट (निष्क्रिय खाती)
डॉर्मंट खाती ती असतात ज्यामध्ये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नसतो. अशी खाती सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असतात. अशा खात्यांना बंद करून आरबीआय ग्राहकांची आणि बँकिंग प्रणालीची सुरक्षा सुनिश्चित करू इच्छित आहे.
इनअॅक्टिव्ह अकाउंट
जी खाती मागील 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ निष्क्रिय राहिली आहेत, ती देखील बंद केली जाणार आहेत. या खात्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमचं खाते इनअॅक्टिव्हच्या श्रेणीत येत असेल, तर ते सक्रिय करण्यासाठी त्वरित कारवाई करणं आवश्यक आहे.
झिरो बॅलन्स अकाउंट (शून्य शिल्लक असलेली खाती)
ज्या खात्यांमध्ये दीर्घकाळ शून्य शिल्लक आहे, ती खाती देखील बंद केली जाणार आहेत. हा निर्णय खाती गैरवापरापासून वाचवण्यासाठी, आर्थिक धोका कमी करण्यासाठी आणि ग्राहकांशी बँकेचा सक्रिय संबंध कायम ठेवण्यासाठी घेतला गेला आहे.
तुमचं खाते बंद होण्यापासून वाचवण्यासाठीचे मार्ग
KYC अपडेट करा
जर तुमचं खाते निष्क्रिय असेल, तर लगेच KYC प्रक्रिया पूर्ण करा. यासाठी बँकेच्या शाखेत जा किंवा ऑनलाइन माहिती अपडेट करा.
किमान शिल्लक राखा
तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक असणं सुनिश्चित करा.
व्यवहार सक्रिय ठेवा
खाते सक्रिय ठेवण्यासाठी नियमितपणे व्यवहार करा.
डिजिटल बँकिंगचा अवलंब करा
डिजिटल बँकिंग सेवा वापरणं केवळ सोयीस्करच नाही तर आरबीआयच्या डिजिटलायझेशनच्या प्रयत्नांचाही भाग आहे. तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा आणि आवश्यक ती कारवाई करा.
आरबीआयचे नवीन मार्गदर्शक तत्त्व बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनवण्यासाठी आहेत, आणि ग्राहकांची सतर्कता यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे नवीन वर्षात येणाऱ्या अडचणी टाळता येऊ शकतील.