Post Office Zero Risk Scheme: देशातील सुरक्षित आणि स्थिर परतावा देणाऱ्या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या बचत योजना अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहेत. गुंतवणूक सुरक्षित ठेवायची आणि त्यावर चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीमकडे अनेक गुंतवणूकदारांचा कल आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातूनच लाखोंची कमाई होऊ शकते.
व्याजदरात सरकारी हमी
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याजदर वेगळा असतो. केंद्र सरकार या योजनेचे व्याजदर प्रत्येक तिमाहीला ठरवते. सध्या लागू असलेले व्याजदर पुढीलप्रमाणे आहेत —
- 1 वर्षाचा कालावधी: 6.9%
- 2 वर्षाचा कालावधी: 7.0%
- 3 वर्षांचा कालावधी: 7.1%
- 5 वर्षांचा कालावधी: 7.5%
या व्याजदरांमुळे इच्छेनुसार गुंतवणुकीची मुदत ठरवण्याचा लाभ मिळतो.
5 वर्षांत मिळणार 2 लाखांहून अधिक नफा
टाइम डिपॉझिट स्कीमची लोकप्रियता यामागे सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम व्याजदर हे प्रमुख कारण आहे. 5 वर्षांचा कालावधी आणि 7.5% व्याजदर हे गणित गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते.
उदाहरण:
- गुंतवणूक: ₹5,00,000
- कालावधी: 5 वर्षे
- व्याजदर: 7.5%
5 वर्षांत मिळणारे एकूण व्याज: ₹2,24,974
मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी एकूण रक्कम: ₹7,24,974
म्हणजेच फक्त व्याजातूनच 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते.
गुंतवणुकीत शून्य धोका
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम ही पूर्णपणे शासकीय हमी असलेली, ‘धोकामुक्त गुंतवणूक’ मानली जाते. ज्यांचे उद्दिष्ट सुरक्षित गुंतवणूक आणि स्थिर परतावा हे आहे, त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम समजली जाते.
टॅक्स सवलतीचा फायदा
5 वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा मिळतो—सुरक्षित परतावा आणि टॅक्स बचत.
खाते उघडण्याची नियमावली
- किमान गुंतवणूक: ₹1,000
- जास्तीत जास्त मर्यादा: कोणतीही वरील मर्यादा नाही
- खाते प्रकार: सिंगल किंवा जॉइंट खाते
- 10 वर्षांवरील मुलांसाठी खाते: पालकांच्या संमतीने उघडता येते
- ब्याज जमा होण्याची पद्धत: व्याज वर्षातून एकदा जोडले जाते (अॅन्युअल कंपाउंडिंग)
खाते उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन सोप्या कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो.

