PM Kisan Mandhan Yojana: देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशात करोडो शेतकऱ्यांचं जीवन कृषीवर आधारित आहे. तरीही, अजूनही काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. वयाच्या एका टप्प्यावर, जेव्हा शेतकरी शारीरिकदृष्ट्या कमजोर होतात, तेव्हा त्यांच्याकडे पैसे कमवण्याचा काहीच स्रोत उरत नाही.
या समस्येचा उपाय म्हणून भारत सरकारने PM किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश खास करून शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करणं आहे.
PM किसान मानधन योजनेत 18 ते 40 वर्षे वयाचे शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याच्या वयानुसार गुंतवणुकीची रक्कम ठरवली जाते. गुंतवणुकीची रक्कम 55 रुपये ते 200 रुपये दरमहा असू शकते.
उदाहरणार्थ, जर शेतकरी 18 वर्षांच्या वयात या योजनेत अर्ज करतो, तर त्याला प्रत्येक महिन्याला 55 रुपये गुंतवणूक करावी लागेल. हे 55 रुपये महिन्याचे योगदान त्याला 60 वर्षांपर्यंत करावे लागेल.
60 वर्षांच्या वयानंतर, त्या शेतकऱ्याला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल. PM किसान मानधन योजना फक्त लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी कृषी जमिन आहे.
अर्ज करण्यासाठी, आधार कार्ड, ओळखपत्र, बँक अकाउंट पासबुक, पत्रव्यवहाराचा पत्ता, मोबाइल नंबर, पासपोर्ट साइज फोटो इत्यादी दस्तऐवज असणे आवश्यक आहे. या दस्तऐवजांशिवाय अर्ज रद्द होऊ शकतो.