PF Withdrawn Process: भारतातील खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पीएफ खाते असतात. कर्मचारी भविष्य निधि संगठन (ईपीएफओ) ही भविष्यासाठी बचत योजना आहे. या योजनेमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोन्ही खात्यात समान योगदान देतात. सरकार यावर दरवर्षी व्याज देते. निवृत्तीनंतर हे पैसे काढता येतात.
परंतु तुम्हाला मध्येच कधी गरज भासल्यास तुम्ही यातून पैसे काढू शकता. हा फंड तुम्ही वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर काही कारणांसाठी काढू शकता. तुम्ही ऑनलाइन घरी बसून पीएफ काढू शकता.
ऑनलाइन पीएफ कसे काढावे
- सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in वर जावे लागेल.
- त्यानंतर “ऑनलाइन एडवांस क्लेम” वर क्लिक करून पुढे जा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या UAN आणि पासवर्डसह UAN सदस्य पोर्टलमध्ये लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर “ऑनलाइन सेवा” वर क्लिक करा.
- त्यानंतर EPF मधून PF Advance काढण्यासाठी फॉर्म निवडा.
- त्यानंतर “क्लेम फॉर्म” (फॉर्म 31, 19,10C आणि 10D) निवडा आणि बँक खात्याचे शेवटचे 4 अंक टाकून ते सत्यापित करा.
- त्यानंतर “Proceed for Online Claim” वर क्लिक करा.
- त्यानंतर PF Advance साठी “Form 31” निवडा आणि खाली दिलेल्या कारणांपैकी एक निवडा.
- त्यानंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम भरा, बँक खात्याच्या चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- त्यानंतर घरचा पत्ता भरा.
- शेवटी “Get आधार OTP” वर क्लिक करा.
- तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
अशा प्रकारे तुमचा दावा सादर केला जाईल.
टीप: तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून किती पैसे काढू शकता हे तुमच्या जमा रकमेवर अवलंबून आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.