Pension Update: पेन्शनर्स आणि फॅमिली पेंशन (Pension) घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात एक नवीन अपडेट जारी केले आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला पेन्शन (Pensioners) मिळत असेल, तर सावध राहा.
गेल्या काही दिवसांत लोकांना विविध प्रकारच्या फोन कॉल येत आहेत आणि त्यांच्याकडून PPO नंबर, जन्मतारीख आणि Bank Account ची माहिती विचारली जात आहे. तुमच्याकडेही असा कोणताही फोन येत असेल, तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. फ्रॉड करणारे तुमच्या मेहनतीच्या कमाईचे काही सेकंदात नुकसान करू शकतात. एका रिपोर्टनुसार, हे फ्रॉड करणारे वयोवृद्ध आणि पेन्शनर्स यांना लक्ष्य करत आहेत.
Central Pension Accounting Office ने जारी केलेले विधान
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या Central Pension Accounting Office ने एक विधान जारी केले आहे. यामध्ये पेन्शनर्सना सूचित करण्यात आले आहे की, फ्रॉडस्टर्स स्वत:ला Central Pension Accounting Office, भीकाजी कामा प्लेस, नवी दिल्लीचे अधिकारी म्हणून ओळख देऊन पेन्शनधारकांशी संपर्क साधत आहेत. हे लोक पेन्शनर्सना WhatsApp, Email, SMS द्वारे फॉर्म पाठवतात आणि तो भरायला सांगतात. तसेच, ते धमकी देतात की जर हा फॉर्म भरला नाही, तर पुढच्या महिन्यापासून पेंशन बंद केली जाईल.
तर पुढच्या महिन्यापासून पेंशन बंद होऊ शकते
Central Pension Accounting Office ने पेन्शनर्सना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. CPAO ने पेन्शनर्सना कोणत्याही प्रकारच्या फ्रॉडच्या भूलथापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्यास तुम्ही स्कॅमच्या फसवणुकीपासून बचाव करू शकता.
CPAO ने पेन्शन घेणाऱ्या पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांना सल्ला देताना सांगितले आहे की, कुणालाही आपला PPO Number, Date Of Birth आणि Bank Account Details शेअर करू नका.
ही माहिती कुणाशीही शेअर करू नका
Central Pension Accounting Office ने सर्व पेन्शनर्सना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या स्कॅमच्या फसवणुकीपासून सावध राहा. त्यांनी सांगितले आहे की, फोन कॉल, WhatsApp, Email किंवा SMS वर विचारलेली महत्त्वाची माहिती जसे की— आपला PPO Number, जन्मतारीख आणि Bank Account Details कोणालाही देऊ नका. CPAO ने सर्व CPPC ला सांगितले आहे की, ते सर्व पेन्शनर्सना सतर्क राहण्यास सांगावे.