New CGHS Guidelines: केंद्र सरकारने CGHS आणि ECHS संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करत नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार, 15 डिसेंबर 2025 पासून सुधारित दर लागू झाले आहेत. या तारखेपासून सर्व जुन्या करारांना (MoA) आपोआप रद्द मानले जाणार आहे.
यानंतर, देशभरातील सर्व खाजगी रुग्णालयांना पॅनेलवर राहण्यासाठी पोर्टलमार्फत नव्याने डिजिटल अर्ज करावा लागणार आहे. ठरलेल्या वेळेत ‘अंडरटेकिंग’ न सादर करणारी रुग्णालये थेट पॅनेलमधून बाहेर मानली जातील.
CGHS–ECHS लाभार्थ्यांसाठी याचा अर्थ काय?
नव्या निर्णयाचा थेट परिणाम देशभरातील लाखो CGHS आणि ECHS लाभार्थ्यांवर होणार आहे. अनेक रुग्णालये जुने दर बदलत नसल्याने नाराज होती; दुसरीकडे, पेंशनर्स व कर्मचारी अधिक पारदर्शक सेवा आणि बिलिंगची मागणी करत होते.
नव्या दरांमुळे उपचार खर्चात एकसमानता येईल, तर digital claims, cashless treatment आणि सेवा गुणवत्तेमध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
कोणते बदल झाले?
साल 2025 मध्ये CGHS व्यवस्थेत आधीच अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले होते:
रेफरल आणि क्लेम प्रक्रिया
- रेफरल प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली.
- पेंशनर्ससाठी कॅशलेस उपचाराच्या सेवा वाढवल्या.
- क्लेम सेटलमेंट जलद करण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग लागू.
रुग्णालयांवरील जबाबदारी वाढली
- सेवा नाकारल्यास कडक दंडात्मक कारवाई.
- रुग्णालयांना निश्चित वेळेत क्लेम सबमिट करण्याचे बंधन.
- पारदर्शी बिलिंग आणि रेट कार्ड सार्वजनिक करणे बंधनकारक.
सुधारित दर
सर्जरी, ICU, डायलिसिस, डायग्नॉस्टिक्स, रूम रेंट आदींच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, जेणेकरून खाजगी रुग्णालयांच्या खर्चाशी तुलना करता CGHS दर अधिक वास्तववादी होतील.
रुग्णालयांसाठी नवे नियम
रुग्णालयांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे:
- अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून नवी कागदपत्रे अपलोड करणे.
- सुधारित नियम व अटी स्वीकारणे.
- 90 दिवसांत नव्या MoA वर सही करणे.
ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित रुग्णालय आपोआप पॅनेलमधून बाहेर जाईल.
लाभार्थ्यांवर परिणाम
तत्पुरते काही रुग्णालये पॅनेलमधून बाहेर पडल्याने सुरुवातीला थोडी गैरसोय होऊ शकते. मात्र, सुधारित दर आणि डिजिटल व्यवस्थेमुळे कॅशलेस उपचार अधिक सुकर, तर क्लेम सेटलमेंट जलद होण्याची शक्यता आहे.
सरकारचा उद्देश CGHS–ECHS व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करणे आहे.

