केंद्र सरकारने 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) अंतर्गत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर अनेक लोक आपल्या घरातील वृद्धांसाठी शोध घेत आहेत की ते आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) चा फायदा कसा घेऊ शकतात. वृद्धांचे नवीन कार्ड कसे तयार करायचे आणि योजनेविषयी अधिक माहिती कशी मिळवायची, याबद्दल सर्व माहिती इथे वाचा.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आयुष्मान कार्ड (Ayushman Card) तयार करण्यासाठी वृद्धांना कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. फक्त काही आवश्यक कागदपत्रं लागतील आणि मोबाईल अॅपच्या मदतीने कार्ड तयार होईल.
केंद्र सरकारकडून आदेश जारी
सरकारने यासंदर्भात लवकरच आदेश जाहीर करणार असून एक विशेष मोहिम सुद्धा सुरू करणार आहे. आधार कार्डच्या आधारे वृद्ध मोबाईल अॅपवरून आयुष्मान कार्ड (Ayushman Card) बनवू शकतात. हे कार्ड मिळाल्यावर ते गंभीर आजारांसाठी रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 30 जून 2024 पर्यंत 34 कोटी 7 लाख लोकांनी आयुष्मान कार्ड (Ayushman Card) तयार केले आहे. जर एखाद्या कुटुंबातील सदस्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या कुटुंबातील वृद्धांसाठी नवीन कार्ड बनवावे लागेल. त्यासाठी नव्याने नोंदणी करावी लागेल. एकदा कार्ड तयार झाल्यावर वृद्ध कोणत्याही रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतील.
मोफत माहिती ट्रोल फ्री नंबरवर उपलब्ध
केंद्र सरकारने सांगितले आहे की, 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांनी, जे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ घेत आहेत, आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) अंतर्गत कार्ड बनवण्याचा पर्याय मिळणार आहे. 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांनी खाजगी आरोग्य विमा घेतला असेल, तरी सुद्धा या योजनेत नोंदणी करून कार्ड तयार करू शकतात. आयुष्मान कार्ड (Ayushman Card) संदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास, ट्रोल फ्री नंबर 14555 वर कॉल करून ती मिळवता येईल.
काही राज्यांमध्ये योजना लागू नाही
सध्या दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) लागू केलेली नाही. या राज्यांच्या सरकारांनी अद्याप ही योजना स्वीकारलेली नाही. त्यामुळे या राज्यांतील वृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या, आयुष्मान भारत योजनेत (Ayushman Bharat Scheme) 70 वर्षांवरील वृद्धांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील.