IRCTC Retiring Rooms: जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. अनेकदा असे होते की तुम्ही ज्या शहरात गेला आहात, तिथे तुमच्या बजेटमध्ये रूम मिळत नाही आणि तुम्ही हैराण होता. मात्र, अशा वेळी रेल्वेची ही नवीन सेवा तुम्हाला उपयोगी पडू शकते. रेल्वेने मागील आठवड्यात एक खास सेवा सुरू केली आहे. यामुळे तुम्हाला नवीन शहरात रूमसाठी भटकण्याची गरज नाही. प्रवाशांना स्टेशनवरच राहण्याची सुविधा मिळेल. भारतीय रेल्वेने अनेक स्टेशनांवर ही सुविधा सुरू केली आहे.
हॉटेलसारख्या मिळतात सुविधा
पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच रेल्वेच्या 304 बेडच्या रिटायरिंग रूमचे उद्घाटन केले आहे. तरीही या योजनाबाबत अनेकांना अधिक माहिती नाही. रेल्वे स्टेशनवर कमी भाड्यात चांगल्या सुविधा असलेले रूम उपलब्ध होतात. या रूममध्ये हॉटेलसारख्या सुविधा मिळतात. विशेष म्हणजे या रूमचे भाडे अत्यंत कमी आहे. या रूमची बुकिंग तुम्ही IRCTCच्या माध्यमातून ऑनलाइन करू शकता.
रूमचे भाडे ऐकून तुम्ही म्हणाल वाओ
रेल्वे स्टेशनवर राहण्यासाठी तुम्हाला त्रास करून घेण्याची गरज नाही. खूपच कमी दरात तुम्हाला रात्री राहण्यासाठी केवळ 100 रुपये ते 700 रुपये इतके भाडे भरावे लागते. या रूम कशा बुक करायच्या ते पाहूया…
रूम कसे बुक करावे?
- सर्वप्रथम IRCTC अकाउंट उघडा.
- IRCTCमध्ये लॉगिन करा आणि ‘माय बुकिंग’ या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुम्हाला इथे टिकट बुकिंगच्या खाली ‘रिटायरिंग रूम’चा ऑप्शन मिळेल.
- इथे क्लिक केल्यावर तुम्हाला रूम बुक करण्याचा पर्याय दिसेल.
- इथे तुम्हाला तुमचा प्रवास आणि वैयक्तिक माहिती अपडेट करावी लागेल.
- त्यानंतर पेमेंट करा.
- आता तुमचा रूम बुक झाला आहे.