HDFC Bank: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँक HDFC ने आपल्या ग्राहकांना वर्ष संपण्याआधी मोठा धक्का दिला आहे. बँकेने ओव्हरनाइट कालावधीसाठी MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) 0.05 टक्क्यांनी वाढवले आहे. हा बदल 7 डिसेंबर 2024 पासून लागू झाला आहे. पाहूया, कोणत्या प्रकारच्या कर्जांवर हे दर वाढवले गेले आहेत.
या कर्जांवर वाढवले गेले आहेत दर
HDFC बँकेने MCLR दर फक्त ओव्हरनाइट कालावधीसाठी वाढवले आहेत. आधी ओव्हरनाइट कालावधीसाठी MCLR 9.15 टक्के होता, जो आता वाढवून 9.20 टक्के करण्यात आला आहे.
तुमच्या EMI वर कसा होईल परिणाम?
बँकेचे MCLR रिव्हाइज केल्याने तुमच्या होम लोन, पर्सनल लोन, आणि ऑटो लोनसह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनच्या EMI वर परिणाम होतो. प्रत्यक्षात, MCLR वाढल्यामुळे तुमच्या कर्जावरील व्याजदर वाढतो आणि तुमची EMI वाढते. समजा, तुम्हाला नवीन कर्ज घ्यायचे असल्यास ते आता 0.05 टक्के महाग मिळेल. तसेच, ज्या ग्राहकांचे कर्ज आधीच सुरु आहे, त्यांची EMI वाढेल. मात्र, बँकेने हे दर फक्त ओव्हरनाइट कालावधीसाठी वाढवले आहेत.
7 डिसेंबरपासून हे दर लागू झाले आहेत
- HDFC बँकेचा ओव्हरनाइट MCLR 9.15 टक्क्यांवरून 9.20 टक्के करण्यात आला आहे.
- एक महिन्याचा MCLR 9.20 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- तीन महिन्याचा MCLR 9.30 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल नाही.
- सहा महिन्याचा MCLR 9.45 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल नाही.
- एका वर्षाचा MCLR 9.45 टक्के आहे. यामध्ये बदल करण्यात आलेला नाही.
- 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.45 टक्के आहे. यामध्ये बदल करण्यात आलेला नाही.
- 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.50 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल नाही.