EPFO Alert 2025: कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. चुकीची किंवा खोटी माहिती देऊन पीएफ अकाउंटमधून पैसे काढणाऱ्यांना संपूर्ण रक्कम व्याजासह परत करावी लागेल. तसेच, पुढील काही वर्षे नवीन पैसे काढण्यावरही बंदी येऊ शकते.
EPFO ने दिली महत्वाची सूचना
EPFO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी Twitter) वर पोस्ट करून सांगितले आहे की, EPF Scheme 1952 नुसार खोटा कारण सांगून PF काढल्यास ती रक्कम रिकव्हर केली जाईल. संस्था म्हणते, “आपला पीएफ हा आयुष्यभरासाठी सुरक्षितता कवच आहे. तो केवळ योग्य कारणांसाठीच वापरा.”

PF Members Alert
कधी काढू शकता PF ची रक्कम
EPF Scheme 1952 मध्ये पीएफ काढण्याचे ठराविक नियम स्पष्ट आहेत. खालील परिस्थितीतच पीएफ काढता येतो:
स्वतःच्या, मुलांच्या किंवा भावंडांच्या लग्नासाठी
मुलांच्या शिक्षणासाठी
गंभीर आजाराच्या वेळी
घर खरेदी किंवा बांधकामासाठी
या कारणांसाठी घेतलेला पैसा इतर ठिकाणी वापरल्यास EPFO कडून संपूर्ण रक्कम परत मागवली जाईल आणि त्यावर व्याजही लागू शकते.
सेक्शन 68B(11) चे नियम
EPF च्या सेक्शन 68B(11) नुसार जर तुम्ही निधीचा चुकीचा वापर केल्याचे आढळले, तर पुढील 3 वर्षांपर्यंत कुठलीही निकासी करता येणार नाही. तसेच, संपूर्ण रक्कम व्याजासह जमा होईपर्यंत कोणतेही नवे अॅडव्हान्स मंजूर केले जाणार नाहीत. हा नियम सदस्यांचा भविष्यासाठीचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी आहे.
EPFO चा उद्देश
EPFO ने ही कठोर पावले उचलण्यामागे हेतू सदस्यांचा रिटायरमेंट फंड संरक्षित ठेवणे हा आहे. भविष्यातील सुरक्षिततेसाठी पीएफचा योग्य कारणांसाठीच वापर करावा, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
डिस्क्लेमर: या बातमीतील माहिती अधिकृत EPFO सोशल मीडिया पोस्ट आणि उपलब्ध सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.








