EPFO Rules: प्रत्येक महिन्याला नोकरदारांच्या पगारातून काही टक्के रक्कम त्यांच्या पीएफ खात्यात जाते, याशिवाय कंपनी आपला हिस्सा देखील देते.
पीएफचे पैसे सहसा निवृत्तीच्या वेळी काढले जातात, त्यानंतर चांगली रक्कम तुमच्या हातात येते. ईपीएफओने निवृत्तीचे वय ५५ वर्षे निश्चित केले आहे.
लग्न किंवा इतर कारणांमुळे अनेकांना पीएफ खात्यातून पैसे काढावे लागतात, मात्र याबाबतही नियम बनवले आहेत.
पीएफचे पैसे काढण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे निकष असतात. तुम्ही तुमच्या PF च्या 90 टक्के रक्कम निवृत्तीच्या एक वर्ष आधी काढू शकता.
जर एखाद्याची नोकरी गेली तर तो दोन महिन्यांनंतर पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकतो. लग्न, शिक्षण, वैद्यकीय, घर आणि जमीन खरेदी इत्यादीसाठी पीएफ काढता येतो.
तुम्ही नोकरीत असल्याच्या पाच वर्षांच्या आत पीएफचे पैसे काढल्यास, तुमच्या काढलेल्या रकमेवर टीडीएस कापला जातो. जेव्हा तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढता तेव्हा असे होते. PAN नसल्यास TDS 30% पर्यंत कट होऊ शकतो.
पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा उमंग अॅपद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.