EPF Interest Rate: देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. PF खात्याच्या व्याजदरांबाबत (EPFO Interest Rate) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आशा तुटली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये EPF वर व्याजदर 8.25% निश्चित करण्यात आला होता. यावेळी व्याजदर वाढतील अशी अपेक्षा होती, मात्र तसा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या वर्षी कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात 8th Central Pay Commission (8th CPC) मंजूर करून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. मात्र, आता EPF खातेदार कर्मचाऱ्यांना सरकारने धक्का दिला आहे.
सात कोटी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा भंगल्या
देशभरातील 7 कोटींपेक्षा अधिक EPF खातेदार कर्मचारी पीएफ खात्याच्या व्याजदरांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा करत होते. कर्मचाऱ्यांना 8.50% पर्यंत व्याजदर वाढण्याची आशा होती, मात्र आता सरकारने हे दर निश्चित करून कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का दिला आहे.
व्याजदरांमध्ये वाढ नाही
Employees’ Provident Fund Organization (EPFO) ने 2024-25 साठी EPF वर 8.25% व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षात देखील हाच दर लागू होता. या वेळी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच, इतर काही छोटी व्याजदर योजना देखील कपातीच्या दिशेने जातील अशी शक्यता आहे.
तरीही तीन वर्षांतील सर्वाधिक व्याजदर
फेब्रुवारी महिन्यात सरकारने कर्मचाऱ्यांना करसवलतीच्या मर्यादेत वाढ करून मोठा दिलासा दिला. तसेच, RBI Repo Rate मध्ये कपात केल्याने कर्जावरील व्याज कमी झाले. यंदाच्या वर्षी EPF व्याजदर वाढले नसले तरी, गेल्या तीन आर्थिक वर्षांतील हा सर्वाधिक व्याजदर आहे.
याआधीचे व्याजदर कमी होते
- 2023 मध्ये EPF व्याजदर 8.15% होता.
- 2022 मध्ये हा दर 8.10% होता.
- इतिहासातील सर्वात कमी EPF व्याजदर 1977-78 मध्ये 8% होता.
- त्यानंतर 2021-22 मध्ये हा दर 8.10% निश्चित करण्यात आला होता.