2025 मध्ये Flexi Cap Mutual Fund ही श्रेणी गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. यावर्षीच्या पहिल्या 6 महिन्यांत इक्विटी कॅटेगरीतील सर्वाधिक गुंतवणूक या प्रकारात झाली आहे. बाजार चढ-उताराचा असो वा स्थिरतेचा काळ, प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदारांनी Flexi Cap Fund वर विश्वास दाखवला आहे. यामागचं कारण म्हणजे या फंडाची खास इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी.
2025 मध्ये ₹31,532 कोटींचा जबरदस्त इनफ्लो
2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत Flexi Cap कॅटेगरीत तब्बल ₹31,532 कोटींची गुंतवणूक झाली आहे. ही रक्कम इतर सर्व इक्विटी फंडांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, जून महिन्यात एकट्या या कॅटेगरीत ₹5,733 कोटींचा सर्वाधिक इनफ्लो नोंदवला गेला. याशिवाय मार्चमध्ये ₹5,615 कोटी, एप्रिलमध्ये ₹5,541 कोटी आणि मेमध्ये ₹3,841 कोटींचा इनफ्लो पाहायला मिळाला.
Flexi Cap Funds का होतोय अधिक आकर्षण?
Flexi Cap Funds मध्ये वाढता रस यामध्ये असलेल्या लवचिक गुंतवणूक धोरणामुळे आहे. या फंडांमध्ये फंड मॅनेजरला Largecap, Midcap आणि Smallcap कंपन्यांमधील गुंतवणूक कधीही बदलण्याची मुभा असते. तसंच वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये देखील गुंतवणूक बदलता येते. त्यामुळे बाजारातील बदलांना हे फंड अधिक प्रभावीपणे तोंड देऊ शकतात.
अशा प्रकारची डायव्हर्सिफाइड गुंतवणूक त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते जे गुंतवणुकीतून वाढीसोबतच थोडी स्थिरता देखील शोधत असतात.
3 वर्षांत पैसा डबल करणारे 5 टॉप Flexi Cap Funds
- Invesco India Flexi Cap Fund : 27.76%
- Motilal Oswal Flexi Cap Fund : 27.64%
- JM Flexicap Fund : 27.17%
- HDFC Focused Fund : 27%
- Bank of India Flexi Cap Fund : 26.97%
नोट: जर एखाद्या स्कीमचा 3 वर्षांचा CAGR (Compound Annual Growth Rate) 27% असेल, तर त्याचा अॅब्सोल्युट रिटर्न 200% पेक्षा जास्त असतो.
5 वर्षांत पैसा ट्रिपल करणारे Flexi Cap Funds
- Quant Flexi Cap Fund : 31.92%
- HDFC Focused Fund : 29.83%
- HDFC Flexi Cap Fund : 29.72%
- Bank of India Flexi Cap Fund : 29.57%
- JM Flexicap Fund : 27.17%
- ICICI Pru Focused Equity Fund : 26.70%
नोट: जर एखाद्या Mutual Fund स्कीमचा 5 वर्षांचा CAGR 26% असेल, तर अॅब्सोल्युट रिटर्न 300% पेक्षा अधिक होतो.
2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत 10% पेक्षा अधिक परतावा देणारे फंड
- ICICI Pru Retirement Pure Equity Fund : 14.30%
- ICICI Pru Focused Equity Fund : 12.60%
- Tata Flexi Cap Fund : 11.01%
- Nippon India Focused Fund : 10.83%
- Kotak Flexicap Fund : 10.72%
- HDFC Focused Fund : 10.07%
Flexi Cap Funds गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून पुढे येत आहेत. विशेषतः दीर्घकालीन दृष्टिकोन असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे फंड चांगले रिटर्न्स देण्याची क्षमता बाळगतात.
Disclaimer:
या लेखात दिलेली माहिती वेगवेगळ्या वित्तीय अहवाल आणि विश्लेषणांवर आधारित आहे. Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना बाजाराचा जोखीम विचारात घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्या.