How to Check Credit Report: डिजिटल व्यवहार वाढल्यावर फसवणुकीचं प्रमाणही झपाट्यानं वाढलं आहे. आर्थिक व्यवहार करताना जर थोडीशीही बेफिकिरी झाली, तर तुमचे संपूर्ण बँक खाते रिकामं होऊ शकतं. सध्या बरेच जण Personal loan, car loan, bike loan किंवा home loan घेतात, तसंच जवळपास प्रत्येकाकडे credit card सुद्धा असतो. पण तुम्ही कधी तपासून पाहिलंय का की तुमच्या नावावर नेमकं किती loans आणि credit cards आहेत?
तुमच्या PAN किंवा Aadhaar चा गैरवापर करून कुणीतरी तुमच्या नावावर लोन घेतलं असेल, तर त्याची माहिती ‘credit report’ मधून मिळू शकते.
Credit Report म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीनं आतापर्यंत घेतलेले loans, credit cards, त्याची repayment history वगैरे सर्व माहिती credit report किंवा CIBIL report मध्ये असते. CIBIL ही एक प्रसिद्ध credit bureau असून, बँका किंवा financial institutions च्या माध्यमातून ही माहिती मिळते. या रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमचा credit score सुद्धा पाहायला मिळतो, जो कर्ज घेण्यासाठी महत्त्वाचा असतो.
स्वतःची CIBIL रिपोर्ट कशी पाहायची?
Step 1: सर्वप्रथम www.cibil.com या वेबसाईटला भेट द्या.
Step 2: “Get Your Free CIBIL Score” या पर्यायावर क्लिक करा.
Step 3: तुमचं पूर्ण नाव, PAN नंबर, email, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि OTP टाका.
Step 4: आता एक पासवर्ड तयार करा आणि तुमचं account सेटअप करा.
Step 5: लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा CIBIL score आणि संपूर्ण report स्क्रीनवर दिसेल. इथे तुमच्या नावावर असलेले सर्व loans आणि credit cards यांची माहिती मिळेल.
Paytm वरून CIBIL Report कशी पाहायची?
Step 1: Paytm app उघडा.
Step 2: Search box मध्ये “Credit Score” टाईप करा आणि खाली दिसणाऱ्या icon वर क्लिक करा.
Step 3: आता तुमचा credit score स्क्रीनवर दिसेल.
Step 4: त्याखाली credit report summary असेल, जिच्याशेजारी ‘view details’ हा पर्याय दिसेल — त्यावर क्लिक करा.
Step 5: आता संपूर्ण credit report समोर येईल. यात तुमच्या नावावर असलेले सर्व loans आणि credit cards यांचा तपशील असेल.
फसवणूक समजल्यास काय करावे?
तुमच्या credit report मध्ये जर अशा कोणत्याही loan किंवा credit card ची माहिती दिसत असेल, जी तुम्ही घेतलेलीच नाही, तर लगेच RBI च्या https://cms.rbi.org.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. तक्रार करताना संबंधित bank किंवा NBFC चं नाव, तुमचा PAN, Aadhaar आणि credit report यांची scan केलेली प्रत अपलोड करावी लागेल.
तसेच त्या बँक किंवा NBFC कडे थेट तक्रार करा आणि सांगा की तुम्ही लोन घेतलेलं नाही. ही तक्रार दिल्याची रिसीविंग देखील घेऊन ठेवा.
फसवणुकीपासून बचावासाठी टिप्स
- PAN आणि Aadhaar कार्डची फोटो कॉपी अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
- सर्वसामान्य Aadhaar च्या जागी masked Aadhaar किंवा password-protected Aadhaar वापरा.
- सोशल मीडियावर PAN किंवा Aadhaar कार्ड share करू नका.
- कार्ड हरवले असल्यास लगेच पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवा.
- कमी-अधीक अंतराने तुमची credit report तपासत राहा.
Disclaimer: वरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. तुमच्या credit संबंधित समस्यांसाठी तुम्ही अधिकृत संस्था किंवा बँकेशी संपर्क साधावा.