रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 December 2025 रोजी रेपो दरात 25 बेसिस पॉइंटची कपात केली. या निर्णयानंतर बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांनी कर्जदर कमी करण्यास सुरुवात केली. याआधी गृहकर्जाचे व्याजदर जवळपास 9% होते, मात्र आता बहुतेक बँकांचे दर सुमारे 8% च्या आसपास आले आहेत. या पार्श्वभूमीवर LIC Housing Finance ने सर्वात कमी व्याजदर जाहीर करून लक्ष वेधले आहे.
22 December पासून नवे दर लागू
LIC Housing Finance ने जाहीर केलेला 7.15% व्याजदर 22 December 2025 पासून लागू करण्यात आला आहे. हा दर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI च्या तुलनेत 0.10% ने कमी आहे. RBI च्या Monetary Policy Committee ने December मध्ये रेपो दर 5.25% पर्यंत कमी केल्यानंतर कर्ज बाजारात हालचाल वाढली असून घर खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
LIC Housing Finance चा नवा गृहकर्ज दर
LIC Housing Finance कडून नव्या गृहकर्जावर 7.15% इतका प्रारंभिक व्याजदर दिला जात आहे. हा दर 825 किंवा त्यापेक्षा जास्त CIBIL Score असलेल्या ग्राहकांसाठी लागू आहे. हा व्याजदर Rs. 5 crore पर्यंतच्या गृहकर्जावर प्रभावी राहणार आहे. कंपनीच्या मते, सध्या घरांची मागणी काहीशी मंद असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
SBI पेक्षा LIC कसे स्वस्त ठरते?
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI नव्या गृहकर्जासाठी 7.25% पासून व्याजदर देत आहे. हे दर 15 December 2025 पासून लागू झाले आहेत. LIC Housing Finance चा दर SBI पेक्षा 0.10% ने कमी असल्याने उत्तम क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांसाठी LIC हा अधिक किफायतशीर पर्याय ठरतो. खासगी तसेच इतर सार्वजनिक बँकांच्या तुलनेतही LIC Housing Finance सध्या कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे.
गृहकर्जदारांना थेट दिलासा
गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्याचा थेट परिणाम मासिक हप्त्यांवर होतो. कमी व्याजदरामुळे EMI कमी होते आणि एकूण परतफेडीवरील भार हलका होतो. त्यामुळे येत्या काळात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

