आपण बरेच पैसे कमावतो, परंतु त्याचा योग्य वापर न केल्यामुळे आपण कायम खर्चातच असतो आणि बचत करणे शक्य होत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे पैशांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येत नाही. जर आपण योग्य पैसे व्यवस्थापन केल्यास, आपल्याला आपल्या सर्व गरजा पूर्ण करता येतील आणि भविष्यासाठी चांगली बचतही करू शकता. यासाठी 50-30-20 फॉर्म्युला खूप उपयुक्त ठरतो.
50-30-20 नियम काय आहे?
50-30-20 फॉर्म्युला हा पैशांचे व्यवस्थापन (money management) करण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. यामध्ये आपल्या एकूण उत्पन्नाचे 50% गरजेच्या खर्चांसाठी, 30% आवडीनिवडींच्या खर्चांसाठी, आणि 20% बचतीसाठी राखून ठेवले जाते.
फॉर्म्युला वापरण्याची पद्धत:
- 50% गरजेच्या खर्चांसाठी: घरखर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे यांसारख्या आवश्यक गोष्टींसाठी वापरा.
- 30% आवडीनिवडींसाठी खर्च: चित्रपट पाहणे, खरेदी करणे, फिरायला जाणे यांसारख्या आवडीनिवडींसाठी खर्च करा.
- 20% बचतीसाठी: भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक रक्कम बचत करा.
उदाहरणाद्वारे समजून घ्या
जर आपण दरमहा ₹80,000 कमावता, तर 50-30-20 नियमानुसार त्याचे विभाजन असे होईल:
- ₹40,000 (50%) गरजेच्या खर्चांसाठी,
- ₹24,000 (30%) आवडीनिवडींसाठी खर्च करा,
- ₹16,000 (20%) बचतीसाठी राखून ठेवा.
अधिक पैसे वाचवण्यासाठी काही टिप्स:
आपल्याला आवडीनिवडींवर कमी खर्च करायचा आणि वाईट सवयी वर खर्च कमी किंवा बंद केल्यास ते बचत वाढवण्यासाठी उत्तम आहे. मात्र तसे करणे तुम्हाला कठीण असेल, तरीही किमान 20% रक्कम बचत म्हणून ठेवणे अत्यावश्यक आहे.
बचत केलेले पैसे कुठे गुंतवावेत?
1. सावधपणे गुंतवणूक करा:
बचत केलेल्या पैशांचे योग्य नियोजन करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि जास्तीत जास्त पैसे वाचवा.
2. नियमित गुंतवणूक:
गुंतवणुकीची सवय लावा. आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन योग्य पॉलिसी निवडा आणि दरमहा गुंतवणूक करा.
3. आरोग्य विमा आणि आकस्मिक विमा:
अनपेक्षित परिस्थितींमध्ये आरोग्य विमा आणि आकस्मिक विमा फारच उपयोगी ठरतो.
4. टर्म इंशुरन्स:
आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा करण्यासाठी टर्म इंशुरन्स घ्या. आपण नसतानाही कुटुंबाला आर्थिक आधार मिळू शकेल.
5. पेंशन योजना:
वृद्धापकाळाचा विचार करून योग्य पेंशन योजना घ्या. निवृत्तीच्या वेळी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.