5 डिसेंबर रोजी बुध ग्रहांचे राशी परिवर्तन, या 7 राशींसाठी फायद्याचे तर बाकीच्यांना नुकसान

बुद्धी आणि तर्क यांचा कारक बुध ग्रह 5 डिसेंबर 2019 रोजी तुला मधून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 25 डिसेंबर 2019 रोजी तो धनु राशी मध्ये जाईल. बुध ग्रहाचे राशी परिवर्तन सगळ्या राशीवर शुभाशुभ प्रभाव टाकणार आहे. चला जाणून घेऊ सगळ्या राशीवर बुध काय परिणाम करणार आहे.

मेष : कार्यक्षेत्रा मध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत हे राशी परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक राहणार आहे. त्यामुळे जास्त काळजी करण्यासारखे काहीही नाही आहे.

वृषभ : बुध ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा फायदा आपल्याला होणार आहे. जीवनसाथी सोबत आपले नाते जास्त चांगले होतील. जर आपण पार्टनरशिप मध्ये बिजनेस करत असाल तर त्यामध्ये फायदा होईल.

मिथुन : बुध ग्रह राशी परिवर्तन झाल्याने या काळात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या गुप्त शत्रूंपासून सावध राहणे गरजेचे आहे.

कर्क : बुध ग्रह परिवर्तन झाल्याने आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. अभ्यासात मन रमेल आणि मनासारखे परिणाम आपल्याला प्राप्त होतील.

सिंह : बुध ग्रह ने आपली राशी बदल केल्याने आपला लाभ होणार आहे. आपल्या चल-अचल संपत्ती मध्ये वाढ होऊ शकते. आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यात सुधारणा होईल.

कन्या : या काळा मध्ये आपला आत्मविश्वास, साहस आणि पराक्रम वाढल्याची अनुभूती होईल. आपल्या भाऊ बहिणी सोबत आपले नाते अधिक जास्त दृढ होतील.

तुला : बुध ग्रहांच्या राशी बदलामुळे आपल्या कम्युनिकेशन स्किल्स मध्ये सुधारणा झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तसेच आपण पैसे बचत करण्यात देखील यशस्वी राहाल.

वृश्चिक : आपल्याला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबा मध्ये एखाद्या सोबत आपला वाद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे आपण आपण या काळात संयम बाळगणे आपल्या फायद्याचे राहील.

धनु : या काळात आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अश्या स्थिती मध्ये आपण कोणताही व्यवहार करताना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करणे हिताचे राहील.

मकर : या राशीसाठी बुध राशी परिवर्तन फायदेशीर राहणार आहे. आपल्याला यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपले उत्पन्न वाढेल. एका पेक्षा जास्त मार्गाने धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे.

कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. याकाळात आपल्याला तणावाचा सामना देखील करावा लागू शकतो. परंतु हे अगदी काही दिवसांसाठी राहील त्यानंतर परिस्थिती सामान्य होईल.

मीन : या काळात आपल्या ज्ञाना मध्ये वाढ होईल. आपण धार्मिक कार्यक्रमा मध्ये सहभागी होऊ शकता. हा काळ आपल्यासाठी लाभदायक राहील आपले भाग्य आपल्याला साथ देईल.

टीप : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.