foodhealth

लवंग दिसते लहानशी पण कोणतीही वेदना, दमा, मळमळणे यासारख्या 10 समस्यात गुणकारी, पहा कसा वापर करावा

लवंग आपल्याला 10 फायदे देते आज आपण त्याबद्दल माहीती घेऊया. लवंग मध्ये युजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारखे प्रोब्लेम दूर करण्यासाठी मदत करते. लवंग प्रवृत्तीने गरम असते. यासाठी सर्दी-खोकला झाल्यास लवंग खावी किंवा याचा चहा करून प्यावा. जर तुम्ही लवंग तेलाचा वापर करत असाल तर खोबरेल तेला सोबत करावा कारण लवंगची गरम प्रवृत्तीमुळे आरोग्याला काही नुकसान होऊ नये. लवंग जीवनशक्तीच्या कोशांचे पोषण करते. यामुळे लवंग टी.बी. आणि ताप यामध्ये एन्टीबायोटीक चे काम करते. हे रक्तशोधक आणि किटाणूनाशक असते. लवंग मध्ये तोंड, आतडे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म किटाणू आणि सडन थांबवण्याचे गुण असतात.

चांगली लवंग कशी ओळखावी

दुकानात मिळणारी लवंग कधी कधी खालच्या दर्जाची असते त्यामधील तेल काढलेले असते. अश्या अगोदरच तेल काढलेल्या लवंगला सुरकुत्या पडलेल्या असतात. अश्या लवंग खरेदी करू नये. लवंग पासून अनेक नैसर्गिक औषधी तयार होतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की एक लवंग किती कमाल करते, चला पाहू लवंगचे फायदे.

लवंगचे 10 अप्रतिम फायदे

खराब पचनक्रिया : लवंग 10 ग्राम, सुंठ 10 ग्राम, काळीमिरी 10 ग्राम, पीपल 10 ग्राम, ओवा 10 ग्राम सर्व एकत्र बारीक करून यामध्ये 1 ग्राम सेंधवमीठ मिक्स करा. या मिश्रणाला एका स्टीलच्या भांड्यात ठेवून वरून लिंबाचा रस टाका. जेव्हा हे कडक होईल तेव्हा हे सावली मध्ये सुकवून 5-5 ग्राम सकाळ-संध्याकाळ जेवणा नंतर पाण्यासोबत घ्यावे.

चक्कर येत असल्यास : सर्वात पहिले दोन लवंग घ्या आणि यांना दोन कप पाण्यामध्ये टाकून उकळावे. यानंतर हे पाणी थंड झाल्यावर चक्कर येत असलेल्या व्यक्तीला पिण्यास द्यावे. चक्कर येणे बंद होईल.

साइटिका : लवंगच्या तेलाने पायांवर मालिश केल्याने साइटिकाच्या वेदना कमी होतात.

टांसिल वाढणे : एक खायचे पान, 2 लवंग, अर्धा चमचा जेष्ठ मध, 4 दाने पिपरमेंट सर्व एक ग्लास पाण्यात मिक्स करून काढा बनवून प्यावे.

दातदुखी : 5 ग्राम लिंबू रस मध्ये 3 लवंग पावडर करून मिक्स करा. हे मिश्रण दाताला लावून मालिश करावी आणि खड्ड्यात लावावी यामुळे दातदुखी थांबते.

दमा किंवा श्वासाचे विकार : दोन लवंग 150 मिलीलीटर पाण्यात उकळवा आणि या पाण्याला थोड्याशा मात्रेत पिण्यामुळे अस्थमा आणि श्वासाचे विकार बरे होतात.

दाताचे किडे : किडे लागलेल्या दातांना लवंगाच्या तेलात कापूस भिजवून ठेवावा. यामुळे दाताचे किडे नष्ट होतात आणि दातदुखी थांबते.

कंबरदुखी : लवंगच्या तेलाने मालिश केल्यामुळे कंबरदुखी सोबत अन्य भागाच्या वेदना देखील थांबतात. याच्या तेलाची मालिश अंघोळी अगोदर करावी.

पोटातील गैस : 2 लवंग बारीक करून अर्धा कप उकळलेल्या पाण्यात टाकावी. मग थंड झाल्यावर प्यावे. अश्या पद्धतीने हा प्रयोग रोज 3 वेळा केल्यामुळे पोटातील गैस कमी होतो.

मळमळ होणे : 2 लवंगची पावडर करून अर्धा कप पाण्यात मिक्स करावी आणि पाणी गरम करून पाजल्यामुळे मळमळ थांबते. लवंग चघळल्यामुळे ही मळमळ थांबते.

 


Show More

Related Articles

Back to top button