Connect with us

घरातील या कोपऱ्यात कधी करू नका जेवण, वाईट आरोग्य, गरिबी सोबत येतील इतर अनेक समस्या

Astrology

घरातील या कोपऱ्यात कधी करू नका जेवण, वाईट आरोग्य, गरिबी सोबत येतील इतर अनेक समस्या

घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहण्यासाठी घर वास्तुशास्त्रानुसार असणे आवश्यक आहे. ज्या घरात वास्तुदोष असतो त्या मध्ये समस्या येत असतात. याचे कारण ज्या घरामध्ये वास्तूशास्त्र पाळले नसते तेथे नेगेटिव एनर्जी जास्त असते. ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवर वाईट प्रभाव टाकतात.

घरात एखाद्या सुविधेची कमी असली तर चालेल पण कधीही स्वयंपाकघरात अन्नाची कमी नसली पाहिजे. अश्यात जेव्हा तुम्ही घरात जेव्हा जेवण करता त्याच्या संबंधी देखील वास्तू नियम असतात. तुम्ही कोठे आणि कसे जेवण करत आहेत याच्या तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि प्रगतीवर परिणाम होतो.

ही गोष्ट लक्षात घेऊनच आज आम्ही तुम्हाला काही नियम सांगत आहोत ज्यांचे पालन तुम्हाला घरामध्ये जेवण करताना केले पाहिजे. लक्षात असू द्या या नियमांचे पालन घरातील प्रत्येक सदस्याने केले पाहिजे. तुमच्या एकट्याच्या करण्यामुळे ते पूर्णतः फायादेमंद होणार नाही.

घरामध्ये अन्न खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की लोक किचन स्टैंड वर प्लेट ठेवून खाण्यास सुरुवात करतात किंवा चव घेण्यास सुरुवात करतात. किचन स्टैंड ती जागा आहे जेथे आपण संपूर्ण घराचे भोजन तयार करतो. यास अन्नपूर्णा देवीचे स्थान देखील मानले जाते. अश्या मध्ये जेव्हा आपण किचन स्टैंडवरच प्लेट ठेवून खाण्यास सुरुवात करतो तेव्हा ती संपूर्ण जागा उष्टी होऊन अपमानित होते. असे केल्यामुळे अन्नपूर्णा देवी रुष्ट होते आणि त्यामुळे घरामध्ये समस्या निर्माण होतात. यासाठी चुकूनही घरातील किचन स्टैंडवर नाश्ता किंवा जेवण खाऊ नये.

जर तुम्ही किचन मध्ये जेवायला बसत असाल तर अश्या परस्थिती मध्ये कधीही असे बसू नका की तुमची पाठ ही गैसच्या शेगडीकडे राहील. तुमची पाठ कधीही त्या दिशेला नसावी जेथे घरातील स्त्री अन्न शिजवते. तुमची पाठ त्या दिशेच्या एवजी इतर कोण्याही दिशेला असल्यास काही हरकत नाही. अन्न बनवण्याच्या जागेला पाठ दाखवून खाणे हे अन्नपूर्णा देवीचा अपमान समजला जातो. यासाठी हे टाळावे.

कधीही भोजन करण्यास सुरुवात कराल तेव्हा हातजोडून अन्नदेवतेचे आभार मानावे. हा नियम तर बहुतांश लोकांच्या घरी पाळला जातो पण तरी देखील काही लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी येथे दिलेला आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top