भारतीय कार बाजारात SUV गाड्यांचा प्रभाव सातत्याने वाढत असला, तरी हॅचबॅक प्रकाराची मागणी आजही कायम आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे Maruti Suzuki WagonR. कॅलेंडर वर्ष 2025 (CY25) मध्ये WagonR ने तब्बल 1.94 लाख युनिट्सची विक्री नोंदवत देशातील नंबर-1 हॅचबॅक कार बनण्याचा मान मिळवला आहे. CNG प्रकारात 34 KM/KG पर्यंत मायलेज आणि 4.98 लाख रुपयांपासून सुरू होणारी किंमत हे या यशामागचे महत्त्वाचे घटक ठरले.
SUV च्या वाढत्या विक्रीतही हॅचबॅकची भक्कम पकड
CY25 मध्ये SUV प्रकाराने भारतीय प्रवासी वाहन बाजारात वर्चस्व मिळवलं असून एकूण विक्रीत SUV चा वाटा 55.3% वर पोहोचला. मात्र, किफायतशीर, शहरासाठी सोयीस्कर आणि देखभाल खर्च कमी असलेल्या WagonR सारख्या हॅचबॅक कारने मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती कायम ठेवली आहे.
WagonR का ठरली ग्राहकांची आवडती कार
Maruti Suzuki WagonR च्या यशामागे अनेक कारणं आहेत. परवडणारी किंमत, उत्तम मायलेज, पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्याय, कमी देखभाल खर्च आणि Maruti ची विश्वासार्ह सर्व्हिस नेटवर्क ही या गाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे लहान शहरांपासून महानगरांपर्यंत WagonR ची मागणी सातत्याने टिकून आहे.
Dzire ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
हॅचबॅक विभागात WagonR ने आघाडी घेतली असताना, संपूर्ण भारतीय कार बाजारात Maruti Suzuki Dzire ने नंबर-1 कार बनण्याचा मान मिळवला. CY25 मध्ये Dzire ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
सेडान विभागात Dzire ची मजबूत पकड
सेडान प्रकारात Dzire ने अव्वल स्थान कायम राखलं आहे. खासगी वापरासोबतच टॅक्सी विभागातही Dzire ला मोठी मागणी आहे. यावरून Maruti Suzuki ची ताकद केवळ एका वाहन प्रकारापुरती मर्यादित नसल्याचं स्पष्ट होतं.
एकूणच CY25 हे वर्ष SUV साठी महत्त्वाचं ठरलं असलं, तरी WagonR आणि Dzire यांच्या विक्रीने हॅचबॅक आणि सेडान प्रकार अजूनही भारतीय ग्राहकांसाठी महत्त्वाचे असल्याचं दाखवून दिलं आहे.

