New 2026 Kia Seltos: नवी 2026 किआ सेल्टॉस ही जगात सर्वप्रथम भारतात अनविल करण्यात आली आहे. कंपनीने लॉन्च प्रक्रियेत कोणतीही विलंब न करता बुकिंग्सची सुरुवात 10 डिसेंबर 2025, मध्यरात्री 12 वाजता करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सेल्टॉसची अधिकृत किंमत 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर होईल, तर डिलिव्हरी मिड-जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहेत.
आकारात मोठी, डिझाइनमध्ये अधिक दमदार
नव्या सेल्टॉसमध्ये 95mm लांबी, 20mm रुंदी, 15mm उंची आणि 80mm मोठा व्हीलबेस मिळतो. यामुळे केबिन स्पेस वाढली असून, SUV ची रोड-प्रेझेन्सही अधिक प्रभावी दिसते. किआच्या माहिती पत्रकानुसार बूटस्पेसमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
नवी सेल्टॉस – प्रमुख वैशिष्ट्ये
- बुकिंग्स सुरू: 10 डिसेंबर, रात्री 12 वाजता — ₹25,000
- किंमत जाहीर: 2 जानेवारी 2026
- डिलिव्हरी: मिड जानेवारी 2026
- डायमेंशन्स: लांबी +40mm, व्हीलबेस +80mm, रुंदी +30mm
एक्सटीरियर हायलाइट्स
- आइस-क्यूब स्टाइल प्रोजेक्शन हेडलॅम्प
- LED फॉग लॅम्प
- पूर्ण-रुंदी कनेक्टेड LED टेललॅम्प
- हिडन रिअर वायपर
- 18-इंच अलॉय व्हील
- ऑटो फ्लश डोर हँडल
इंटीरियर व टेक्नॉलॉजी
- 30-इंच फुल कर्व्ड डिस्प्ले (इन्फोटेनमेंट + क्लस्टर)
- डुअल-झोन AC
- EV6 स्टाइल स्टीयरिंग व्हील
- 10 सिंगल टोन आणि नवे रेड व ग्रे कलर
- ब्लॅक-व्हाईट ड्युल-टोन केबिन
- वेलकम सीट फंक्शन
कम्फर्ट आणि कंविनियन्स
- 10-वे पावर्ड ड्रायव्हर सीट + मेमरी फंक्शन
- वेंटिलेटेड फ्रंट सीट
- रिअर रिक्लाइनिंग सीट
- रिअर सनशेड
- 60:40 स्प्लिट सीट
- पॅनोरमिक सनरूफ
- वायरलेस चार्जर
- पुढे-पाठी Type-C पोर्ट
- 64-कलर एम्बिएंट लाइटिंग
- 8-स्पीकर बोस साऊंड सिस्टम
- 360° कॅमेरा
प्लॅटफॉर्म आणि सेफ्टी
- ग्लोबल K3 प्लॅटफॉर्म (पहिल्यांदा भारतात)
- 24 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स
- 6 एअरबॅग
- ESP, TCS
- ADAS Level-2
कनेक्टिव्हिटी
- वायरलेस Android Auto/Apple CarPlay
- स्मार्ट-की प्रॉक्सिमिटी अनलॉक
- Kia Connect 2.0 – 91 कनेक्टेड फीचर्स
इंजिन ऑप्शन्स
- 1.5 NA पेट्रोल – 115 PS/144 Nm
- 1.5 टर्बो पेट्रोल – 160 PS/253 Nm
- 1.5 डिझेल – 116 PS/250 Nm
ट्रान्समिशन
Manual, iMT, IVT, AT
एक्सटीरियर डिझайн – पूर्णपणे नवी ओळख
नव्या जनरेशन सेल्टॉसला अधिक मस्क्युलर व आधुनिक रूप दिले आहे. मोठी फ्रंट ग्रिल, नवीन बोनट कट, टेलयूराइड-स्टाइल फ्रंट फेस, वर्टिकल DRLs, C-शेप्ड LED सिग्नेचर आणि ड्युल-पेन सनरूफ ही मुख्य आकर्षणे आहेत.
इंटीरियर – फ्युचरिस्टिक व प्रीमियम
या वेळी डॅशबोर्डमध्ये फुल कर्व्ड डिजिटल डिस्प्ले सेटअप देण्यात आला आहे. प्रीमियम सॉफ्ट-टच मटेरियल, नवीन AC कंट्रोल्स, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, मोठा सेंटर कन्सोल – हे सर्व केबिनला अधिक प्रीमियम बनवते.
इंजिन आणि परफॉर्मन्स
पूर्वीसारखेच भरोसेमंद इंजिन पर्याय दिले आहेत. 1.6 हायब्रिडवर चर्चा सुरू असली तरी भारतात याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

