हुंडई क्रेटा सर्व व्हेरियंटच्या नव्या किंमती जाहीर; GST कपातीतून किती बचत होईल, खरेदीपूर्वी ही यादी नक्की पाहा

हुंडई क्रेटा खरेदी करण्याचा विचार करताय? GST 2.0 मुळे सर्व व्हेरियंटच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. जाणून घ्या, नवीन किंमती आणि किती बचत होईल.

On:
Follow Us

देशातील लोकप्रिय आणि नंबर-1 SUV Hyundai Creta च्या किंमतीत मोठी घट झाली आहे. 22 September पासून लागू झालेल्या नव्या GST 2.0 स्लॅबमुळे Hyundai Motor India ने सर्व व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किमती नव्याने जाहीर केल्या आहेत. आता ग्राहकांना मॉडेलनुसार साधारण 70 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

क्रेटाची नवी एक्स-शोरूम किंमत

नव्या GST नंतर Hyundai Creta च्या सर्व व्हेरिएंट्सच्या जुन्या व नव्या किंमतींचा सविस्तर तपशील:

क्रमांकव्हेरिएंटजुनी किंमतनवी किंमतGST कपातबदल %
11.5 E11,10,90010,72,58938,3113.57
21.5 EX12,32,20011,89,70642,4943.57
31.5 EX(0)12,97,19012,52,45544,7353.57
41.5 EX(O) IVT14,37,19013,87,62749,5633.57
51.5 S13,53,70013,07,01646,6843.57
61.5 S(O)14,46,90013,98,93347,9673.43
71.5 S(O) IVT15,96,90015,43,76053,1403.44
81.5 SX15,41,40014,94,03647,3643.17
91.5 SX Tech16,09,40015,69,34640,0542.55
101.5 SX Premium16,18,39015,78,02640,3642.56
111.5 SX Tech IVT17,59,40017,14,17345,2272.64
121.5 SX Premium IVT17,68,39017,22,85345,5372.64
131.5 SX(O)17,46,30016,86,07760,2233.57
141.5 SX(O) IVT18,92,30018,27,04265,2583.57
151.5 SO Tro DeT20,18,90019,49,27669,6243.57
161.5 CRDi E12,68,70012,24,94743,7533.57
171.5 CRDi EX13,91,50013,43,51347,9873.57
181.5 CRDi EX(O)14,56,49014,06,26150,2293.57
191.5 CRDI EX(O) AT15,96,49015,41,43355,0573.57
201.5 CRDi S14,99,99014,48,26151,7293.57
211.5 CRDi S(O)16,05,20015,51,77453,4263.44
221.5 CRDi S(O) AT17,55,20016,96,60158,5993.45
231.5 CRDI SX Tech17,67,70017,22,18745,5132.64
241.5 CRDi SX Premium17,76,69017,30,86745,8232.65
251.5 CRDi SX(O)19,04,70018,39,01465,6863.57
261.5 CRDI SX(O) AT19,99,90019,30,93168,9693.57

क्रेटा N Line नवी एक्स-शोरूम किंमत

क्रमांकव्हेरिएंटजुनी किंमतनवी किंमतGST कपातबदल %
1N8 1.5 Turbo16,93,30016,34,90558,3953.57
2N8 1.5 Turbo DCT18,43,30017,82,62860,6723.4
3N10 1.5 Turbo19,53,30019,94,65550,9482.68
4N10 1.5 Turbo DCT20,48,90019,02,35254,2452.72

छोटी कार व लक्झरी कारसाठी नवीन GST दर

सरकारने 22 September पासून लागू केलेल्या GST 2.0 अंतर्गत छोट्या पेट्रोल व हायब्रिड कारवर GST 28% वरून कमी करून 18% केला आहे. CNG आणि LPG कारवरही हा दर लागू होईल, मात्र त्यासाठी 1200cc किंवा त्याहून कमी इंजिन क्षमता आणि 4 मीटरपर्यंत लांबी ही अट आहे. डिझेल व डिझेल हायब्रिड कारसाठी 1500cc पर्यंत आणि 4 मीटरपर्यंतच्या मॉडेल्सवर देखील 18% GST लागू आहे.

मिड साइज व लक्झरी कारसाठी 40% कर

मध्यम आकाराच्या व लक्झरी कारसाठी GST आता 40% ठेवण्यात आला आहे. यामध्ये 1200cc पेक्षा जास्त क्षमता असलेल्या पेट्रोल कार, 1500cc पेक्षा जास्त क्षमता असलेल्या डिझेल कार, SUV, MUV, MPV आणि XUV प्रकारच्या गाड्यांचा समावेश होतो. 170mm पेक्षा जास्त ग्राउंड क्लीयरन्स असलेल्या सर्व वाहनांवर हा दर लागू होईल.

पूर्वी या गाड्यांवर 28% GST व 22% सेस मिळून एकूण 50% कर लागू होत होता. आता सेस रद्द करून फक्त 40% कर आकारला जाईल. त्यामुळे लक्झरी कार खरेदी करणाऱ्यांनाही 10% करसवलत मिळणार आहे.

ग्राहकांसाठी फायदा

या बदलामुळे Hyundai Creta सह अनेक लोकप्रिय SUV आता आधीपेक्षा स्वस्त मिळतील. नव्या दरांमुळे खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ ठरू शकतो.

Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती सरकारकडून जाहीर केलेल्या GST दरांवर आधारित आहे. वाहन खरेदीपूर्वी अधिकृत शोरूमशी संपर्क साधून अद्ययावत किंमती तपासाव्यात.

Vinod Kamble

My Name is Vinod Kamble, I Work as a Content Writer for MarathiGold and I like Writing Articles.

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel