Railway Station : भारतीय रेल्वे आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. रेल्वे प्रत्येक शहराला मोठ्या शहराशी जोडण्याचे काम करते. अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत ज्यांच्या सौंदर्याची खूप चर्चा आहे.
बिहारमध्ये असे एक रेल्वे स्टेशन देखील आहे, जेथे फलाट क्रमांक १ वरून इतर फलाटांवर जाण्यासाठी रिक्षा घ्यावी लागते. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. या स्थानकावरील दोन फलाटांमधील अंतर दोन किलोमीटर आहे. या प्लेटफार्मची कहाणी खूपच रंजक आहे.
हे स्टेशन बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव बरौनी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या स्थानकावरील गाड्या केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ते 9 पर्यंत धावतात. प्लॅटफॉर्म क्रमांक १ साठी कधीही कोणतीही घोषणा केली जात नाही. या स्टेशनचे प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म 1 पासून नाही तर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून सुरू होतो. कोणाला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जायचे असेल तर त्यासाठी त्याला रिक्षा घ्यावी लागते.
स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ का नाही?
बरौनी स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 का नाही हे आधी जाणून घेऊया. वास्तविक, बरौनी रेल्वे स्टेशन 1833 मध्ये बांधले गेले. त्यावेळी एकच प्लॅटफॉर्म बांधण्यात आला होता. त्याचा वापर बहुतेक माल गाड्यांसाठी होत असे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. स्थानकाचा विस्तार करता आला असता पण जागा मर्यादित होती. मग त्यासाठी या स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर नवीन स्टेशन बांधण्यात आले आणि त्याचे नावही बरौनी ठेवण्यात आले. मात्र तिथल्या स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ बांधण्यात आलेला नाही. त्याची सुरुवात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून झाली.
भारतातील एकमेव स्टेशन
उल्लेखनीय आहे की बरौनी रेल्वे स्टेशन हे भारतातील एकमेव स्टेशन होते ज्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून सुरू झाला. आता त्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार आहे. पूर्वी या रेल्वे स्थानकावर 9 प्लॅटफॉर्म होते, ते आता 8 वर कमी होणार आहेत कारण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पासून सुरू होईल. त्याच वेळी, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 असलेल्या रेल्वे स्थानकाला, 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या, नवीन बरौनी असे नाव देण्यात येणार आहे.