Grah Gochar: फेब्रुवारी २०२३ महिना ग्रहांच्या ज्योतिष शास्त्रच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात सूर्य गोचर (Surya Gochar), शुक्र गोचर, बुध गोचर इत्यादी होत आहेत, ज्याचा सर्व 12 राशींवर मोठा परिणाम होणार.
७ फेब्रुवारीला बुध मकर राशीत प्रवेश करताच बुधादित्य योग तयार होणार. 13 फेब्रुवारीनंतर कुंभ (Aquarius) राशीमध्ये शनि आणि सूर्याची युती होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या सर्व ग्रहस्थिती 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहेत.
मेष : ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारीमध्ये होणारे ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ देईल. अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. पालकांचे सहकार्य मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. जीवनात सुख-समृद्धी वाढेल.
कर्क : फेब्रुवारी महिना कर्क राशीच्या लोकांसाठी खूप आनंददायी असेल. या लोकांना संपत्तीचा मोठा फायदा होईल. व्यवसायात तेजी येईल. व्यवहार काळजीपूर्वक करा, उर्वरित वेळ चांगला जाईल. लव्ह लाईफ चांगले होईल. आदर वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल.
कन्या : ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारीतील ग्रह गोचर कन्या राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल.
तूळ : फेब्रुवारी महिन्यात तूळ राशीच्या लोकांना लाभाच्या अनेक संधी मिळतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. धार्मिक प्रवासाला जाता येईल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायात तेजी येईल. मोठा धनलाभ होऊ शकतो. परदेश प्रवासाची शक्यता आहे.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) फेब्रुवारी महिना खूप चांगला जाईल. या लोकांच्या जीवनात सकारात्मकता येईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात भाग घेता येईल. लाइफ पार्टनरशी संबंध चांगले राहतील.