Safala Ekadashi 19 December 2022: चार राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहे जे 4 राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी सिद्ध होतील.
ज्योतिष शास्त्रात (Astrology) मध्ये 12 राशीचे वर्णन आहे. ज्यांच्यावर ग्रह, नक्षत्र आणि विविध योग यांचा प्रभाव असतो. या राशीवर झालेला प्रभाव त्या राशीच्या व्यक्तीच्या जीवनात दिसून येतो.
ज्योतिष शास्त्रीय दृष्टीने मोठी घटना सफला एकादशीच्या दिवशी होणार आहे. एकाच वेळी तीन शुभ योग तयार होत आहेत. बुधादित्य योग, लक्ष्मी नारायण योग आणि त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे सफला एकादशीचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा स्थितीत या वर्षी सफला एकादशीचे व्रत केल्यास अनेक पटींनी अधिक लाभ होणार आहे. हे तीन शुभ योग कोणत्या 4 राशीला कोणते फायदे देणार जाणून घेऊ.
सफला एकादशीला धनु राशीमध्ये तयार होत असलेल्या या 3 शुभ संयोग – बुधादित्य योग, लक्ष्मीनारायण योग आणि त्रिग्रही योग 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल. या लोकांचे झोपलेले भाग्य जागे होईल, त्यांना बंपर पैसे मिळू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हा शुभ योग आणि सफला एकादशी खूप फलदायी ठरेल.
वृषभ : सफला एकादशीला होणारे हे 3 शुभ योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहतील. या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये मोठी प्रगती पाहण्यास मिळू शकते. वाणीच्या जोरावर कोणतेही मोठे काम सहज पार पडेल. विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे.
तूळ : 19 डिसेंबर 2022 रोजी बनत असलेले 3 शुभ योग तूळ राशीच्या लोकांचे झोपलेले भाग्य जागे करतील. नोकरी आणि व्यवसायात तूळ राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते. पद-पैसा-प्रतिष्ठा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
धनु : सफला एकादशीला फक्त धनु राशीतच 3 शुभ योगांचा अद्भूत संयोग तयार होत असून धनु राशीच्या लोकांना त्याचा मोठा फायदा होईल. या लोकांना चांगले भाग्य लाभेल. प्रमोशन मिळेल, मोठा पैसा मिळेल. आदर वाढेल. सर्वांगीण लाभात राहतील.
मीन : मीन राशीचे सुवर्ण दिवसही सुरू होतील. जे लोक नोकरीच्या शोधात होते त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मिळणारी मोठी संधी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. धनलाभ होईल. उत्पन्न वाढेल.