Shani Shukra Yuti: ज्योतिष शास्त्रा नुसार पुढील 10 दिवस 4 राशीचे लोक मोठी कमाई करणार आहेत. शनि आणि शुक्र यांची मकर राशी मध्ये युति या राशीच्या लोकांना फायदा देणार.
शनि ग्रह हा ज्योतिष शास्त्रा अनुसार महत्वाचा ग्रह आहे. कर्मफलदाता शनि राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मा अनुसार फळ देतात. मकर राशी मध्ये शनि आणि शुक्र यांची युति चार राशीसाठी शुभ फल देणारी आहे.
17 जानेवारी पर्यंत शुक्र आणि शनि यांची युती मकर राशीत आहे. शनि देव या दिवशी आपला मकर राशीतील प्रवास पूर्ण करून कुंभ राशीत गोचर करणार आहेत. चला जाणून घेऊ 17 जानेवारी पर्यंतचा काळ कोणत्या राशीसाठी शुभ आहे.
शुक्र-शनी युति 4 राशीला धनवान करणार
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना शुक्र-शनि युतिचा फायदा होणार आहे. आर्थिक समस्या दूर होतील. जुन्या गुंतवणुकी मधून अनपेक्षित मोठा धनलाभ होऊ शकतो. हाती घेतलेले कार्य यशस्वी होईल. धन प्राप्तीचे नवीन मार्ग मिथुन राशीला मिळतील.
कन्या : कन्या राशीचे लोक या काळात आर्थिक प्रगती करतील. नवीन घर खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे जमा होतील. याच सोबत ऑफिस मध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते ज्याचा फायदा दीर्घकाळ तुम्हाला मिळेल.
मकर : शुक्र आणि शनि यांची युती मकर राशी मध्ये होत असल्याने सर्वाधिक लाभ मकर राशीला मिळेल. या काळात तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होईल. ज्यामुळे तुमची आर्थिकस्थिती मजबूत होईल. तुम्ही नवीन नोकरी किंवा व्यापार सुरु करण्याचा विचार करू शकता.
कुंभ : कुंभ राशी मध्ये शनि गोचर करण्यापूर्वी या राशीला लाभ मिळणार आहे. नोकरी मध्ये उच्च पद मिळू शकते. आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग हाती लागतील. दुसऱ्याला उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.