Guru Gochar 2023: नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ मिळणार, गुरु गोचर 3 राशीला संधी

Guru Gochar 2023 Effect on Zodiac Signs: काही ठराविक काळाने प्रत्येक ग्रहांच्या स्थितीत बदल होतो त्याच प्रमाणे देवगुरु बृहस्‍पतिच्या स्थिती मध्ये देखील 2023 मध्ये मोठा बदल होत आहे.

देवगुरु बृहस्‍पति हे राशीच्या सुख, सौभाग्य, समाजातील मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा यांचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या राशीच्या लोकांसाठी गुरु चांगल्या स्थितीत असतो तेव्हा त्या राशीच्या लोकांना जीवनात फायदा होतो.

या उलट जेव्हा देवगुरु बृहस्‍पति राशीच्या प्रतिकूल असतात तेव्हा आयुष्यात काही अडचणी उद्भवतात. बृहस्‍पतिच्या स्थिती मध्ये 2023 मध्ये वेळोवेळी बदल होणार आहेत.

मार्च महिन्या मध्ये देवगुरु बृहस्पतिचा अस्त होत आहे, त्यानंतर गुरुचा पुन्हा उदय होईल. त्यानंतर 22 एप्रिल 2023 रोजी बृहस्पति स्वतःची राशी मीन सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतील.

गुरु यानंतर मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरु गोचर होण्याचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव होणार. ज्यामध्ये 3 राशीच्या लोकांवर याचा खूप सकारात्मक प्रभाव होईल. या राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे.

मेष : मेष राशीच्या लोकांना गुरु गोचरमुळे खूप लाभ होईल. देवगुरु गुरु राशी बदलून मेष राशीत प्रवेश करत असल्याने याचा मोठा प्रभाव दिसून येईल. गुरु गोचर 2023 मुळे मेष राशीच्या लोकांना शुभ फळ मिळेल. या लोकांना ते करत असलेल्या कामाच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती होऊ शकते. भाग्य मेष राशीच्या लोकांची साथ देईल. यामुळे तुमची कामे मार्गी लागतील आणि तुमचा आनंद द्विगुणीत होईल.

मिथुन : देवगुरु गुरु गोचर होण्याचा मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदा होणार आहे. या लोकांच्या आर्थिक स्थितीत मजबुती येऊ शकते. मिथुन राशीच्या लोकांना एखादे मोठे पद मिळू शकते. जे लोक नोकरी बदल करण्याचा विचार करत आहेत त्यांना यश मिळेल. या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफाही मिळू शकतो आणि या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तारही करु शकता. ज्याचा भविष्यात लाभ होऊन हाती पैसा येईल आणि तुमचे जीवन आर्थिक स्थिर होईल.

सिंह : गुरु गोचर 2023 मुळे सिंह राशीच्या लोकांसाठी मोठा लाभ देणारा काळ. देवगुरु गुरु गोचरने भाग्य साथ देईल. मेहनतीचे सिंह राशीला पूर्ण फळ मिळेल. कामात यश मिळेल. नोकरी मध्ये बॉस कडून मोठी संधी मिळू शकते. करिअरमध्ये लाभ होईल. सिंह राशीला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि नोकरीत प्रमोशन मिळू शकते. या राशीच्या काही लोकांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकतो.

Follow us on

Sharing Is Caring: