money

40 हजार रु. सैलरी घेणारा लाइन इंस्पेक्टर निघाला अरबपती, 100 करोड़ची प्रॉपर्टी, यामध्ये 57 एकर जमीन, 6 बंगले, 2 प्लॉट शामिल

जो व्यक्ती महिन्याला 40 हजार रुपये पगार घेतो तो किती संपत्ती जमवू शकतो किंवा किती श्रीमंत असू शकतो तर तुमचे उत्तर जे उत्तर असेल त्यापेक्षा जास्त म्हणजेच तुमच्या कल्पना शक्ती पेक्षा जास्त संपत्ती एका लाइन इन्स्पेक्टरने जमा केली आहे. या लाइन इन्स्पेक्टरचे नाव आहे एस. लक्ष्मी रेड्डी हा आंध्रप्रदेश मधील नेल्लूर येथील आहे. याच्याकडे 100 करोड रुपया पेक्षा जास्त बेनामी मालमत्ता मिळाली आहे. या मालमत्ते मध्ये 57 एकर शेत जमीन, 6 आलीशान घर आणि 2 प्लॉट शामिल आहेत. या लाइन इन्स्पेक्टरला अटक करण्यात आली आहे.

या प्रोपर्टी वर भ्रष्टाचार निरोधक ब्युरो (एसीबी) केलेल्या कारवाई बद्दल एसीबीचे डायरेक्टर जनरल आर पी ठाकूर यांच्या अनुसार आंध्रप्रदेश ट्रान्समिशन कॉर्पोरेशन मध्ये कार्यरत लाइन इन्स्पेक्टर एस. लक्ष्मी रेड्डी (56) याच्या नेल्लूर आणि प्रकाशम जिल्हयातील 5 ठिकाणा वर छापे मारले गेले. अचल संपत्ती सोबत लक्ष्मी रेड्डीच्या एका बैंक खात्या मध्ये जवळपास 10 लाख रुपये मिळाले. याच्याकडे अनेक गाड्या देखील आहेत. पुढील कारवाई मध्ये आणखीन संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. रेड्डीने सर्व संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमवली आहे. त्याने सरकारी जमीन विकल्याची देखील शक्यता आहे.

25 वर्षात मिळाले 3 प्रमोशन

एस. लक्ष्मी रेड्डी 1993 मध्ये हेल्पर पदावर नोकरीस लागला होता. तीन वर्षा नंतर तो सहायक लाइनमैन आणि त्याच्या पुढील वर्षी प्रमोट होऊन लाइनमैन झाला. 2014 मध्ये रेड्डीचे प्रमोशन होऊन तो लाइन इन्स्पेक्टर पदावर आला.


Tags
Show More

Related Articles

Back to top button