कोंडाजी बाबांची भूमिका करणारे आनंद काळे खऱ्या आयुष्यात कसे आहेत, चला जाणून घेऊ

कोंडाजी बाबा म्हणजेच कोंडाजी फर्जद यांची भूमिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिके मध्ये आनंद काळे यांनी केली होती. या भूमिकेला लोकांनी भरभरून प्रेम दिले कारण तश्या ताकदीने आनंद काळेंनी ती भूमिका केली होती. मालिके मधील त्यांचा अभिनय पाहून असेच वाटत होते कि कोंडाजी बाबा खरोखरच आपल्या समोर आहेत. असा अभिनय आनंद काळे यांनी केला. चला जाणून घेऊ आनंद काळे बद्दल सविस्तर माहिती.

आनंद काळे यांचा जन्म 2 सप्टेंबर 1972 रोजी कोल्हापूर मध्ये झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापुरातच झाले आहे आणि त्यांनी कॉमर्स मधून पदवी मिळवली आहे. त्यांना आपल्या कॉलेज लाईफ मध्ये फुटबॉल खेळण्यास आवडत होते. ते सध्या मुंबईला राहतात. परंतु कोल्हापूर मध्ये त्यांची दोन हॉटेल आहेत. ‘राजपुरुष’ आणि ‘कार्निवल’ ही या हॉटेलची नावे आहेत. रिकाम्या वेळेत त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे.

 

आनंद काळे हे मागील अनेक वर्षा पासून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी ‘चार दिवस सासूचे’ ही ईटीव्ही मराठी वर येणाऱ्या मालिके मध्ये आठ वर्ष काम केले. या मालिके मध्ये त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका केली होती. आनंद काळे हे अभिनया सोबतच निर्मिती आणि दिग्दर्शन देखील करतात. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी फिल्म्स आणि टीव्ही सिरियल्स केल्या आहेत.

आनंद काळे यांनी हिंदी मध्ये ‘पी से पीएम तक’ हा चित्रपट केला आहे. तर मराठी मध्ये ‘वाहिनीसाहेब’, ‘जिवलगा’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘वृंदावन’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तर हिंदी मध्ये ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केले आहे.

आनंद काळे यांनी आज पर्यंत 36 चित्रपट केले आहेत त्यामध्ये ‘घे भरारी’, आबा जिंदाबाद’, ‘माहेरची पाहुणी’ यासारखे चित्रपट केले आहेत. तर बॉलिवूड मध्ये ‘पी से पीएम तक’ हा चित्रपट केला आहे. एवढंच नाही तर आनंद काळे यांनी हॉलिवूड (इंग्रजी चित्रपट) मध्ये देखील काम केले आहे त्यांनी ‘Remember Amnesia’ या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आता महालक्ष्मी सिने सर्विस हे प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे आणि यांच्या माध्यमातून ते टीव्ही सिरीयल आणि वेबसिरीज तयार करणार आहेत.

आनंद काळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांनी केलेल्या कोंडाजी बाबाच्या अप्रतिम अभिनयासाठी त्यांचे अभिनंदन आणि सलाम. आपल्याला आनंद काळे यांची कोंडाजी बाबांची भूमिका आवडली असेल आणि आनंद काळे यांच्या अभिनया बद्दल आपल्या काय भावना आहेत हे आपण कमेंट मध्ये लिहू शकता. कोंडाजी बाबांच्या उत्तम अभिनयासाठी आनंद काळे यांच्या माहिती बद्दलच्या या पोस्टसाठी एक लाईक आणि शेयर तर बनतोच ना मित्रांनो.