celebritiesentertenment

4 तासामध्ये तयार होत होता 2.0 चा खतरनाक व्हिलन, अक्षयच्या करियर मधील सगळ्यात मोठी फिल्म

29 नोव्हेंबर रोजी भारतीय सिनेमाची सर्वात मोठी फिल्म 2.0 रिलीज झाली आणि या फिल्म कडून फिल्म समीक्षकांच्या अनके अपेक्षा देखील आहेत. या फिल्म मध्ये साउथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार पहिल्यांदा एकत्र पाहण्यास मिळणार आहेत ते देखील ऑपोजीट कारण अक्षय कुमार फिल्म मध्ये एक डॉ. रिचर्ड नावाच्या एका खतरनाक व्हिलनच्या भूमिकेत आहे. त्याचा लुक पाहून भल्याभल्यांचा घाम निघतो आणि लोकांना अक्षयच्या या भूमिकेमुळे भीती वाटू शकते.

फिल्म 2.0 आता पर्यतची सगळ्यात महागडी फिल्म आहे या फिल्मची लांबी अडीच तास आहे पण या अडीच तासामध्ये तुमचे पैसे चांगलेच याची काळजी अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी घेतली आहे. अक्षयचा हा लुक विशेष या करीता आहे कारण यासाठी त्याला 4 तास तयारी करण्यात जात होते 2.0 चा खतरनाक व्हिलन तुम्हाला नक्कीच आश्चर्य चकित करेल.

4 तास लागत होते 2.0 चा भयंकर व्हिलन

जवळपास सगळ्या चित्रपटगृहात 2.0 हाऊसफुल आहे आणि अपेक्षा केली जात आहे कि फिल्म नवीन रेकॉर्ड बनवू शकते. अक्षय कुमार पहिल्यांदा व्हिलनच्या भूमिकेत आहे एक खतरनाक व्हिलन ज्याचा मेकअप करणे सोप्पे नव्हते आणि अक्षयच्या मेकअप प्रक्रिया वेदनादायक होती. असे यासाठी कि फिल्म मध्ये आपल्या भूमिकेसाठी तयार होण्यासाठी अक्षय कुमारला प्रोस्थेटिक्स (कृत्रिम मेकअप) प्रोसेस मधून जावे लागले. ज्यामध्ये दररोज 4 ते 5 तास मेकअप करण्यासाठी लागायचे. याच सोबत अक्षयला अनेक समस्या येत असत ती म्हणजे मेकअप काढण्यासाठी 2 तास वेळ आरामात लागायचा. पहा व्हिडीओ.

फिल्मच्या प्रमोशन दरम्यान अक्षय म्हणाला होता कि या फिल्मची शुटींग माझ्या धैर्य आणि शांतीची परीक्षा होती. मेकअप बद्दल अक्षय म्हणतो “प्रोस्थेटिक्स प्रक्रिया माझ्यासाठी खरोखरच कठीण होती. यासाठी मला जवळपास चार तास लागत  होते आणि त्या दरम्यान मला चुपचाप बसावे लागत होते. तीन व्यक्ती माझा मेकअप करायचे आणि मला न बोलता बसावे लागत होते जे माझ्यासाठी कठीण होते. मी सांगू इच्छितो या प्रक्रियेने मला शांत आणि धैर्यवान बनवले.” अक्षयने पुढे सांगितले कि शुटींग दरम्यान 38 ते 40 दिवस मला काही खाण्याची परवानगी नव्हती. जेव्हा तुम्ही प्रोस्थेटिक्स मेकअप केलेला असतो तेव्हा काहीही खाण्याची परवानगी दिली जात नाही कारण प्रोस्थेटिक सूट तुमच्या आकाराचा बनलेला असतो आणि त्या शुटींग दरम्यान लिक्वीड डाइट वर रहायचे असते आणि त्या दिवशी तुम्हाला फक्त ज्यूस, मिल्कशेक आणि पाणी पिण्याची परवानगी असते.

यास म्हणतात प्रोस्थेटिक्स प्रक्रिया

फिल्म 2.0 मध्ये अक्षय कुमारने केलेल्या मेकअपला प्रोस्थेटिक्स मेकअप म्हंटले जाते. हे तर तुम्हाला समजले पण तुम्हाला माहित आहे का प्रोस्थेटिक्स प्रक्रिया काय आहे? या प्रक्रियेत कलाकाराच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या प्रत्येक भागावर मेकअप केला जातो. त्यास तसेच प्लास्टर ऑफ पेरीस ने बनवले जाते यानंतर तयार झालेल्या डमी वर सिलिकॉनच्या मदतीने आतून आणि बाहेरून बनवले जाते. यामध्ये एक खास मेक्सअप असते जे दोन्ही पृष्ठभागावर भरले जाते. यानंतर हे आवरण त्या व्यक्तीवर चीटकते आणि मास्क सारखे दिसायला लागते. याचा अंदाज तुम्हाला व्हिडिओ मध्ये येऊ शकतो.

Show More

Related Articles

Back to top button
Close