Connect with us

घरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने

Money

घरबसल्या आधारकार्ड मधील चुका दुरुस्त करा या अगदी सोप्प्या पद्धतीने

सरकारच्या बहुतेक सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेला आहे. पण आधार कार्डामध्ये कधी कधी काही चुका असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास होताना दिसत आहे. काहींच्या आधार कार्डवरचं नाव चुकलं आहे तर काहींची जन्म तारीख चुकीची आहे. आधार कार्डवरच्या या चुका आता तुम्ही घरबसल्या दुरुस्त करू शकता.

आधारच्या वेबसाईटवर जाऊन नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईलनंबर आणि ई-मेल अॅड्रेस अपडेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जावं लागेल. या पोर्टलवर गेल्यावर तिकडे तुमचा आधार क्रमांक लिहा.

आधार क्रमांक लिहील्यानंतर तुमच्या रजीस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी पोर्टलवर टाकल्यावर तुम्हाला लॉग इन करता येईल. लॉग ईन केल्यावर अपडेट पोर्टलवर जाऊन डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. त्यानंतर आधार अपडेट फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये चुकीची माहिती बदलून सबमिट बटण दाबल्यावर तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.

आधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्यासाठीची कागदपत्रही द्यावी लागणार आहेत. पण ई मेल आयडी, मोबाईल नंबर आणि लिंग याबद्दलची माहिती बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही. तर नाव, जन्म तारीख आणि पत्ता यांची माहिती बदलण्यासाठी कागदपत्र देणं बंधनकारक असणार आहे. यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशन किंवा पीडीएस फोटो कार्ड, व्होटर आयडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्र चालणार आहेत.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top