रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी (19 ऑक्टोबर 2025): IRCTC New Rule अंतर्गत आता प्रवाशांना ट्रेन प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा मिळणार आहे — आणि तीही तिकीट रद्द करण्याच्या फीशिवाय! या नव्या नियमानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन नियमामुळे प्रवाशांना मोठा फायदा
सध्या जर प्रवाशाची ट्रेन चुकली, तर त्याला कोणताही परतावा मिळत नाही. तसेच तिकीट रद्द केल्यास वेळेनुसार २५ ते ५० टक्के शुल्क भरावे लागते. या व्यवस्थेमुळे अनेकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. पण नव्या IRCTC नियमामुळे हे सगळं बदलणार आहे.
प्रवासाची तारीख बदलण्याची नवी सुविधा
या नव्या व्यवस्थेनुसार प्रवाशांना तिकीट रद्द करण्याऐवजी प्रवासाची तारीख बदलण्याचा पर्याय मिळणार आहे. प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा ॲपवर लॉग इन करून प्रवासाची तारीख किंवा ट्रेन निवडू शकतील. मात्र, संबंधित ट्रेनमध्ये जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. जर नवीन ट्रेनचं भाडं अधिक असेल, तर त्यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागतील.
प्रवाशांसाठी दिलासा देणारा निर्णय
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी किंवा अचानक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय फारच उपयुक्त ठरणार आहे. पूर्वी ट्रेन चुकल्यास संपूर्ण भाडे बुडत होतं, पण आता प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान टळेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर बनेल.
कधीपासून लागू होणार नवा नियम?
ही नवी सुविधा नेमकी कधी सुरु होईल याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून ही प्रणाली लागू होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.









