Bank Holidays Diwali 2025: दिवाळी सण सुरु होताच बाजारपेठ, ऑफिस आणि घरांमध्ये सजावटीची लगबग वाढत आहे. या काळात देशभरात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असतात. चला तर पाहूया bank holidays Diwali Maharashtra नुसार महाराष्ट्रात बँका कधी-कधी बंद राहणार आहेत.
दिवाळीत किती दिवस बँका बंद राहणार?
ऑक्टोबर महिन्यात बँकांच्या सर्वाधिक सुट्ट्या आहेत. 19 ऑक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. त्यानंतर, 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये दीपावली, नरक चतुर्दशी आणि काली पूजा निमित्त बँका बंद राहतील.
महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरलाही सुट्टी
21 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन, दिवाळी अमावस्या आणि गोवर्धन पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्किम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर येथील सर्व बँका बंद राहतील.
22 आणि 23 ऑक्टोबरलाही राहील बँक सुट्टी
22 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा, विक्रम संवत नववर्ष, गोवर्धन पूजा आणि लक्ष्मी पूजा या सणांच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्व बँका बंद राहतील.
23 ऑक्टोबरला भाऊबीज, चित्रगुप्त जयंती आणि निंगोल चकौबा या सणांमुळे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि हिमाचल प्रदेशातही बँका बंद राहतील.
ऑक्टोबर महिन्यात एकूण किती सुट्ट्या?
2025 च्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 21 दिवस बँक सुट्ट्या आहेत. यामध्ये 4 रविवार, 2 शनिवार आणि स्थानिक सणांच्या 15 सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे असल्यास आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार
बँका बंद असल्या तरी ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा यांचा वापर करता येईल. मात्र, काही ठिकाणी रोख व्यवहारांमध्ये थोडा विलंब होऊ शकतो.









