सणासुदीच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या किमतींनी नवे उच्चांक गाठले आहेत. आजच्या व्यवहारात सोन्याने आणि चांदीने विक्रमी उसळी घेतली असून बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार सोन्याने ऑल टाइम हाय गाठले आहे, तर चांदीही 1.50 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.
सोन्याला जबर उसळी
Gold Silver Price 30 September नुसार, 24 कॅरेट सोन्याने आज तब्बल 1,449 रुपयांची उडी घेतली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर आता 1,12,0410 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. IBJA च्या माहितीनुसार आज सोनं बिना जीएसटी 1,16,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडलं, तर सोमवारी ते 1,15,454 रुपयांवर बंद झालं होतं.
चांदीची किंमतही विक्रमी
चांदीने आज 673 रुपयांची वाढ नोंदवली आहे. जीएसटीसह तिचा भाव 1,49,411 रुपये प्रति किलो झाला आहे. सोमवारी चांदी बिना जीएसटी 1,44,387 रुपये प्रति किलो दराने बंद झाली होती, तर आज ती 1,45,060 रुपये दराने उघडली.
एका महिन्यात प्रचंड वाढ
या सप्टेंबर महिन्यात सोनं 14,515 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागलं आहे. त्याचबरोबर, चांदीच्या किमतींमध्ये प्रति किलो 27,488 रुपयांची उसळी नोंदली गेली आहे. ऑगस्टच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी सोनं 1,02,388 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं, तर चांदी 1,17,572 रुपये प्रति किलोवर होती.
कॅरेटनुसार सोन्याचे दर
23 कॅरेट सोनं 1,443 रुपयांनी वाढून 1,16,435 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं. जीएसटीसह त्याची किंमत 1,19,928 रुपये झाली आहे.
22 कॅरेट सोनं 1,327 रुपयांनी महागून 1,07,083 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहे. जीएसटीसह हा दर 1,10,295 रुपये आहे.
18 कॅरेट सोनं 1,086 रुपयांनी वाढून 87,677 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं असून जीएसटीसह आता 90,307 रुपये आहे.
14 कॅरेट सोनं 847 रुपयांनी उडी मारून 68,388 रुपये झाले आहे. जीएसटीसह आता ते 70,439 रुपयांवर गेले आहे.
गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये उत्साह
सोने-चांदीच्या सततच्या विक्रमी भावामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याचवेळी ग्राहकांसाठी मात्र दरवाढ आव्हानात्मक ठरत आहे. तरीही सणासुदीच्या खरेदीत याचा परिणाम होणारच आहे.

