भारतामधील अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि हमीदार उत्पन्न देणाऱ्या योजनांचा शोध घेत असतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना (Post Office Scheme) सर्वात विश्वासार्ह पर्यायांपैकी एक मानल्या जातात. 📩 पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, टीडी, पीपीएफ, किसान विकास पत्र यांसारख्या योजनांबरोबरच मंथली इनकम स्कीम (MIS) ही योजना देखील लोकप्रिय आहे. या स्कीममध्ये एकदाच गुंतवणूक केली की दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात रक्कम खात्यात जमा होत राहते.
MIS स्कीममध्ये कसा मिळतो फायदा?
मंथली इनकम स्कीम (MIS) ही अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना नियमित दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असते. या योजनेत तुम्हाला एकदाच पैसे जमा करावे लागतात आणि त्यावर दर महिन्याला व्याज मिळत राहते. ही योजना वैयक्तिक खात्यासोबतच जॉइंट अकाउंटनेही उघडता येते.
व्याजदर आणि गुंतवणुकीची मर्यादा
सध्या पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमवर वार्षिक 7.4% व्याजदर मिळतो. या योजनेत किमान ₹1000 पासून खाते उघडता येते. एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ₹9 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते, तर जॉइंट अकाउंटमध्ये ही मर्यादा ₹15 लाख आहे. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 3 जणांचा समावेश होऊ शकतो.
दर महिन्याला मिळणारे हमीदार व्याज
जर तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर जॉइंट अकाउंटद्वारे ₹15 लाख गुंतवणूक केली, तर दर महिन्याला ₹9250 व्याजाच्या स्वरूपात तुमच्या खात्यात जमा होईल. 💰 या योजनेंतर्गत दर महिन्याला मिळणारे फिक्स व्याज हे नोकरी करणारे, ज्येष्ठ नागरिक किंवा नियमित उत्पन्नाची गरज असणाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरतो.
कालावधी आणि परतावा
पोस्ट ऑफिसची ही योजना 5 वर्षांच्या कालावधीसाठी असते. 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात परत जमा केली जाते. मात्र, MIS खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स अकाउंट असणे बंधनकारक आहे.
कोणासाठी योग्य आहे ही स्कीम?
नोकरी सोडून निवृत्ती घेतलेल्या लोकांसाठी, गृहिणींसाठी, तसेच ज्यांना सुरक्षित आणि रिस्क-फ्री गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम उत्तम पर्याय आहे. ✅









